Independent Day speech in Marathi for seven class
Answers
Answer:
here is ur speech mate
Explanation:
स्वातंत्र्य दिवस हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे.[१] ब्रिटिश साम्राज्यापासून दिनांक १५ ऑगस्ट इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले.[२] त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.[३][४]
भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात योगदान असलेल्या सर्व ज्ञात-अज्ञात व्यक्तींचे कृतज्ञतापूर्वक स्मरण या दिवशी केले जाते.
इतिहास इ.स. १७७० पासून भारतावर इंग्रजांचे राज्य होते. १९व्या शतकापासूनच सर्व राजांना इंग्रजांनी आपल्या सैन्यबळावर ताब्यात ठेवले होते. १८५७ च्या स्वातंत्र्य समरानंतर ब्रिटिशांनी त्यांची व्यवस्था अजूनच शिस्तीची केली. १८८५ साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. २०व्या शतकात महात्मा गांधी ह्यांनी अहिंसेच्या मार्गाने चले जाओ आंदोलन व अशी अनेक आंदोलने केली. गांधींनी सविनय कायदेभंग चळवळीचे नेतृत्व केले. १९२९ साली लाहोर च्या सत्रात काँग्रेसने 'संपूर्ण स्वराज्या'ची घोषणा केली. त्यावेळी त्यांनी २६ जानेवारी ही तारीख भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणून घोषणा करायची योजना केली. १९३० साली काँग्रेसने निवडणुका जिंकल्या. त्यानंतर संपूर्ण स्वराज्यासाठी सर्व नेत्यांनी असहकार आंदोलन केले. १९४० साली मुस्लिम कार्यकर्ते हे मुख्य प्रवाहापासून वेगळे झाले व त्यांनी ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना केली.
दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिशांना लक्षात आले की, आपल्याला भारतावरचे राज्य व युद्ध हे सांभाळता येणार नाही आहे. तसेच दुसऱ्या बाजूला भारतीय क्रांतिकारकांचा जोर वाढत होता. ही गोष्ट कळल्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधानांनी जून १९४७ पर्यंत भारत पूर्णपणे स्वतंत्र करण्याची हमी दिली. अखेर दिनांक १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. पण त्यावेळी भारताचे पाकिस्तान आणि भारत असे दोन तुकडेही पडले. पाकिस्तानी भागात राहणाऱ्या अनेक पंजाब्यांना व सिंधीना त्यांचे घरदार, पैसा सोडून यावे लागले. अनेक लोक ह्यामध्ये मारलेही गेले. पुढे ह्या विभाजनामुळे काश्मीरचा प्रश्नही पुढे आला.
hope u like it u canalso leave the last para...
■■स्वातंत्र्यदिवसानिमित्त केलेले भाषण■■
या कार्यक्रमात उपस्थित असलेलले आदरणीय मुख्यधापक सर,माननीय शिक्षकांचे मी अभिवादन करते आणि माझे सगळे विद्यार्थी मित्र मैत्रीणींचे मनापासून स्वागत करतो.आज स्वातंत्र्यदिवसानिमित्त मी तुमच्याशी काही बोलू इच्छितो.
१५ ऑगस्ट हा दिवस भारताचा स्वातंत्र्यदिवस म्हणून साजरा केला जातो.याच दिवशी,१९४७ रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले होते.
पूर्वी भारतावर इंग्रज राज्य करत होते.त्यांनी आपल्यावर खूप अन्याय केले होते.त्यांचा आपल्या देशातील मोठमोठ्या देशभक्तांनी विरोध केला.लोकांना इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी एकत्र केले.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक महापुरुषांनी बलिदान दिले.खूप मेहनत केल्यानंतर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले.
स्वातंत्र्यदिवस हा राष्ट्रीय उत्सव आपल्याकडे उत्साहाने व आनंदाने साजरा करतात.शाळा,कॉलेज व आपल्या परिसरातील विभागात झेंडावंदन केले जाते.
स्वातंत्रयवीरांच्या गोष्टी सांगितल्या जातात.
काही ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम ठेवले जातात.शाळा,कॉलेजमध्ये वकतृत्व स्पर्धा आयोजित केल्या जातात.यादिवशी सगळेजण उत्साहात असतात.घरोघरी झेंडे उभारले जातात.राष्ट्रध्वजाचे बिल्ले छातीवर लावतात.
स्वातंत्र्यदिवस भारतभर अभिमानाने साजरा केला जातो.
भारत माता की जय!!