Indian education info in Marathi
Answers
भारतात प्राचीन काळी गुरुकुलपद्धतीने शिक्षण दिलं जाई. त्यात विद्यार्थी गुरूच्या घरी राहून ज्ञान मिळवत. तिथेच घरकाम, शेती यांसारख्या गोष्टींमध्ये मदत करत. त्यांच्याकडे तेव्हा पुस्तकं वगैरे नव्हती. त्यामुळे वेद-उपनिषदांचं पाठांतर करून ज्ञान मिळविलं जाई. तर कृषी, पशुपालन, वाणिज्य, स्थापत्य, मूर्तिकला, नृत्य, संगीत, सुतारकाम, धातुकाम असेही त्यांचे अभ्यासविषय असत. तक्षशिला, नालंदा यांसारख्या विद्यापीठांतील उच्च शिक्षणात वक्तृत्व, वादविवाद, प्रश्न-प्रतिप्रश्न यांवर व चिकित्सक बुद्धी यांवर भर असे. धनुर्विद्या, आयुर्वेद, अन्य व्यवहारोपयोगी विद्या व कला यांत प्रात्यक्षिकांचा भाग मोठा असे. पाठांतराच्या बरोबरीनेच निरीक्षण, अनुकरण, मार्गदर्शन व चिंतन यांवरही भर असायचा.
Answer:
भारतात प्राचीन काळी गुरुकुलपद्धतीने शिक्षण दिलं जाई. त्यात विद्यार्थी गुरूच्या घरी राहून ज्ञान मिळवत. तिथेच घरकाम, शेती यांसारख्या गोष्टींमध्ये मदत करत. त्यांच्याकडे तेव्हा पुस्तकं वगैरे नव्हती. त्यामुळे वेद-उपनिषदांचं पाठांतर करून ज्ञान मिळविलं जाई. तर कृषी, पशुपालन, वाणिज्य, स्थापत्य, मूर्तिकला, नृत्य, संगीत, सुतारकाम, धातुकाम असेही त्यांचे अभ्यासविषय असत. तक्षशिला, नालंदा यांसारख्या विद्यापीठांतील उच्च शिक्षणात वक्तृत्व, वादविवाद, प्रश्न-प्रतिप्रश्न यांवर व चिकित्सक बुद्धी यांवर भर असे. धनुर्विद्या, आयुर्वेद, अन्य व्यवहारोपयोगी विद्या व कला यांत प्रात्यक्षिकांचा भाग मोठा असे. पाठांतराच्या बरोबरीनेच निरीक्षण, अनुकरण, मार्गदर्शन व चिंतन यांवरही भर असायचा.परंपरागत शिक्षणपद्धतीला धक्का देण्याचा पहिला प्रयत्न सॉक्रेटीसने केला. शिकणाऱ्याला प्रश्न व प्रतिप्रश्न करून, त्यालाच विचार करायला लावून ज्ञानाचा शोध घेण्याची पद्धती त्याने रूढ केली. या संवादात्मक व प्रश्नप्रधान पद्धतीलाच पुढे ‘सॉक्रेटीसची पद्धती’ हे नामाभिधान मिळालं. उपनिषदात ही पद्धत आढळते; परंतु ही पद्धत फार काळ टिकली नाही. सॉक्रेटीसनंतरच्या जवळजवळ हजार वर्षांच्या काळात ख्रिश्चनांमध्ये पुन्हा पूर्वीची पाठांतरपद्धती रूढ झाली. पवित्र ग्रंथाचं वाचन व पठण एवढंच त्या काळात शिक्षणाचं उद्दिष्ट होतं. सोळाव्या शतकात कोमीनियसने चित्रमय पुस्तकं आणली. त्यानंतर प्रचलित शिक्षणपद्धतीला जबरदस्त धक्का दिला तो रुसो याने. रूसो हा बालककेंद्री शिक्षणाचा आद्य प्रणेता होय. शिक्षणात अनुभव व कृती यांना त्याने स्थान दिलं. बालकाच्या स्वातंत्र्याचाही तो पुरस्कर्ता होता. शिक्षणात क्रीडाप्रवृत्तीला वाव देऊन भाषा, इतिहास इ. विषय शैशवकुमारावस्थेतील विद्यार्थ्यांना शिकवण्याचा उपक्रम इंग्लंडमध्ये कॉल्डवेल कुक याने पुढे केला. त्याने आपल्या पद्धतीला ‘क्रीडापद्धती’ असंच नाव दिलं. माध्यमिक स्तरावर अध्यापनपद्धतीला नवं वळण लावण्याचा यशस्वी प्रयत्न प्रथम हेर्बार्ट याने केला. हेर्बार्टच्या पद्धतीची छाप भारत, इंग्लंड व अमेरिका या देशांतील शिक्षणपद्धतीवर अजूनही आहे. बालकांच्या शिक्षणाचा प्रयोगशील दृष्टीने अधिक विचार मारिया माँटेसरी या शिक्षणतज्ज्ञ असलेल्या महिलेने केला. गरीब व मंदबुद्धी असणाऱ्या मुलांच्या शिक्षणाबाबत प्रयोग करून तिने आपली पद्धती शोधून काढली. ‘बालक-मंदिर’ या नावाने तिची संस्था ओळखली जाते. अमेरिकेत शब्दनिष्ठ अध्यापनाविरूद्धची टीका बरीच जुनी आहे. शिकवणं म्हणजे संशोधन, नवा अनुभव घेणं, या विचारांचा पुरस्कार प्रथम आर्मस्ट्राँग याने केला व ‘ह्यूरिस्टिक पद्धती’ शोधली. भूगोल, विज्ञान, गणित आदी विषयांना ती विशेष उपयुक्त आहे. तर भूगोल, विज्ञान या विषयांच्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष निसर्गाकडे जाणं, सहली काढणं, इ. उपक्रमांना फ्रॅन्सिस पार्कर याने आरंभ केला.
please mark as brainlist