information about amboli ghat in marathi don't give wrong answer please this is my activity please..wrong answer will be report
Answers
Question:
information about amboli ghat in marathi
Answer:
महाराष्ट्रातील सह्याद्री डोंगररांगेत आंबोली घाट नावाचे चार घाटरस्ते आहेत. यापैकी सिंधुदुर्गातील आंबोली घाट अधिक प्रसिद्ध आहे
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली हे ठिकाण निसर्ग पर्यटनासाठी खूप प्रसिद्ध आहे. म्हणून आंबोलीला पर्यटकांची नेहमी गर्दी असते. आंबोलीत गावापासून साधारण तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या पांढऱ्या शुभ्र फेसाळणाऱ्या धबधब्याखाली भिजण्यासाठी पुणे, मुंबई, ठाणे ,कोल्हापूर, गोवा आणि कर्नाटकातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असते. आंबोलीतला धबधबा हा पर्यटकांना भुरळ घालतो. म्हणूनच पर्यटक धबधब्याखाली तासंतास ओलेचिंब होऊन नाचत परमसुख अनुभवतात. या धबधब्याखाली भिजण्यासाठी पर्यटकांची जणू झुंबडच उडालेली असते. याशिवाय धबधब्या शेजारी ,रस्त्यावर किंवा मिळेल त्या जागेवर पर्यटकांनी आपल्या सोबत आणलेल्या म्युजिक सिस्टीमच्या तालावर बेधुंद होऊन नाचताना सर्वत्र दिसतात. कर्नाटक व गोवा येथिल पर्यटकांची बहुदा संख्या जास्त असते. जसे लोणावळा व खंडाळा हे पुणे आणि मुंबई येथील पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे तसेच बेळगाव व गोव्याच्या पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे.
वैशिष्ट्ये :
प्रचंड पाऊस, धबधबे, दाट जंगल आणि भरपूर विविध प्रकारची जैवविविधता आढळते. आंबोली घाटात दर वर्षी धबधबा पाहण्यासाठी खूप पर्यटक येतात. आंबोलीला महाराष्ट्राचे चेरापुंजी म्हणून ओळखले जाते. (पर्जन्यमान ७५० सेंटिमीटर). आंबोलीमधील पारपोली गावाजवळचा धबधबा सर्वात मोठा आहे. आंबोलीजवळ नांगरतास हा प्रसिद्ध धबधबा आहे. येथील हिरण्यकेशी नदीचा उगम हे पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. येथील देवराई समृध्दपूर्ण जैवविविधता संपन्न आहे.
जैवविविधता :
महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू
विविध प्रकारची बुरशी, बुरशीमुळे प्रकाशणारे लाकूड, उभयचर प्राणी, महाराष्टाचे राज्यफुलपाखरू व रानफुले या परिसरात पहायला मिळतात.
महाराष्ट्रातील सह्याद्री डोंगररांगेत आंबोली घाट नावाचे चार घाटरस्ते आहेत. यापैकी सिंधुदुर्गातील आंबोली घाट अधिक प्रसिद्ध आहेप्रचंड पाऊस, धबधबे, दाट जंगल आणि भरपूर विविध प्रकारची जैवविविधता आढळते. आंबोली घाटात दर वर्षी धबधबा पाहण्यासाठी खूप पर्यटक येतात. आंबोलीला महाराष्ट्राचे चेरापुंजी म्हणून ओळखले जाते. (पर्जन्यमान ७५० सेंटिमीटर). आंबोलीमधील पारपोली गावाजवळचा धबधबा सर्वात मोठा आहे. आंबोलीजवळ नांगरतास हा प्रसिद्ध धबधबा आहे. येथील हिरण्यकेशी नदीचा उगम हे पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. येथील देवराई समृध्दपूर्ण जैवविविधता संपन्न आहेविविध प्रकारची बुरशी, बुरशीमुळे प्रकाशणारे लाकूड, उभयचर प्राणी, महाराष्टाचे राज्यफुलपाखरू व रानफुले या परिसरात पहायला मिळतात