India Languages, asked by AngelHolmes, 1 year ago

information about cranes in Marathi

Answers

Answered by rakul1
13
पाणथळी पक्ष्यामध्ये कदाचित सर्वात रुबाबदार पक्षी कुठले तर क्रौंच पक्ष्यांकडे बोट दाखवावे लागेल. क्रौंच पक्ष्यांच्या अनेक जाती आहेत अत्यंत लांबवर उड्डाणांसाठि प्रसिद्ध असलेले हे क्रौंच पक्षी इतर पाणथळी पक्ष्यांपेक्षा बरेच दुर्मिळ आहे. दुर्मिळ असण्याचे मुख्य कारण त्यांची होणारी शिकार तसेच प्रजननाचे कमी प्रमाण व इतर मानवी हस्तक्षेप इत्यादी आहेत. इतर पाणथळी पक्ष्याचे म्हणजे हेरॉन, करकोचे व बगळ्यांचे क्रौंच हे भाउबंद आहेत. लांब वरुन हे सारखेच दिसतात परंतु क्रौंच पक्षी जेव्हा उडतात तेव्हा त्यांची मान लांब करून उडतात तर इतर बगळे व करकोचे हे मान इंग्रजी एस आकारात दुमडुन उडतात. तसेच इतरांपेक्षा क्रौंच पक्षी हे लांबवर उड्डाणे भरतात. काही आंतरखंडीय स्थलांतर करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. ते कधी कधी मोठे मोठे कळप करून राहातात तर कधी कधी एकटे अथवा फक्त जोडिदाराबरोबर असतात.



Answered by halamadrid
3

Answer:

क्रौंच पक्षींचे पाय मोठे,शरीर उंच आणि टोकदार,तीक्ष्ण अशी चोच असते.या चोचीचा उपयोग ते अन्न पकडण्यासाठी करतात.हे पक्षी प्राणी आणि वनस्पती दोन्हीं खातात.उडत असताना ते त्यांची मान बाहेर पसरवतात.आर्द्र प्रदेश आणि गवताळ प्रदेशांवर हे पक्षी आढळतात.

क्रौंच पक्षी जोड्यांमध्ये किंवा इतर क्रौंच पक्ष्यांबरोबर एकत्र पाहायला मिळतात.या पक्षीचे पंधरा वेगवेगळ्या प्रजाती आहेत.साधारणपणे ३०-४० वर्षांपर्यंत क्रौंच पक्षी जगतात.

आपल्या पौष्टिक तत्त्वांच्या गरजेनुसार आणि त्रुतूनुसार क्रौंच पक्षीं आपला आहार बदलत असतात.प्रजननासाठी ते एक विशेष प्रकारचा नृत्य करतात.ते वेगवेगळे प्रकारचे आवाज काढत असतात,प्रत्येक आवाजाच्या मागे काही विशिष्ट कारण असते.

Explanation:

Similar questions