information about hellen keller in marathi
Answers
I hope this helps you mark as brainliest plz
अशक्यला कसे शक्य करून दाखवता येते याचा उत्तम आदर्श म्हणजे हेलन केलर, आणि काही पिढ्यांसाठी त्यांचा हा आदर्श प्रेरणादायक ठरला आहे. कलाशाखेत पदवी मिळवणा-या त्या पहिल्या मुक-बधीर व्यक्ती होत्या. त्यांनी अनेक अमेरिकन लेखक, राजकीय कार्यकर्ते आणि व्याख्यात्ये यांना शिकवले. त्यांचा जन्म २७जून १८८० मध्ये झाला होता. अमेरिकन संघराज्य पेनसाल्वालिया मध्ये हा दिवस हेलन केलर दिवस म्हणून साजरा होतो. हेलन जन्मत: स्वस्थ होत्या पण त्यांना आजारपणानंतर श्रवण आणि दृष्टीदोष होते. हेलन यांच्या शिक्षिका ऍनी सुलीव्हँन यांनी त्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडविला. त्यांच्या जीवनात भाषेचा अडसर त्यांनी येऊ दिला नाही. दी मिरँकल वर्कर या सिनेमात ही कहाणी चित्रित करण्यात आली आहे. बोटांनी वाचून बोलायची भाषा एकदा हेलन शिकल्या, त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. त्या असामान्य होत्या आणि वयाच्या दहाव्या वर्षी ब्रेलमध्ये प्रविण झाल्या. त्यानंतर त्यांनी अगदी टाईपरायटर वापरायला देखील सुरूवात केली. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी शाळेत जाण्यास सुरुवात केली आणि १९०४मध्ये त्यांनी रँडिक्लिफ महाविद्यालयातून पदवी मिळवून इतिहास घडविला जगातील पहिल्या मूकबधीर व्यक्तीने पदवी मिळवण्याचा.
image
लिखित भाषेच्या बळावर हेलन यांनी आपले जीवन जगाच्या सेवेत दृष्टिहिनांच्या आणि मूकबधीरा़ंच्या सेवेत समर्पित केले. जे पाहू शकत नाहीत आणि ऐकायला ज्यांना येत नाही त्यांचा त्या चेहरा बनल्या. त्या व्याख्यात्या झाल्या, राजकीय कार्यकर्त्या झाल्या आणि लेखिका सुध्दा. त्यांच्या साहित्यसंपदेत अनेक लेख आणि १२प्रकाशित पुस्तकांचा समावेश होतो. दी स्टोरी ऑफ माय लाईफ (१९०३), दी वर्ल्ड आय लिव्ह इन (१९०८) अश्या पुस्तकांचा त्यात समावेश आहे. त्यांनी अमेरिकेतील समाजवादी (सोशल) पक्षातून औद्योगिक कामगारांसाठी कार्य केले आहे. महिलांच्या हक्काच्या संघर्षात त्यांचे योगदान आहे. कामगारंच्या हक्काच्या लढ्यात आणि समाजवादाच्या लढाईत किंवा अशाच प्रकारच्या न्यायाच्या लढ्यात त्यांचे योगदान आहे.
स्वत:च्या या कार्यातून त्यांनी आज आम्हाला आणि अशा लक्षावधींना प्रेरणा दिल्या आहेत. त्यांच्या काही उदगारातून ही प्रेरणा लोकांना शतकानुशतके मिळत राहिल. सकारात्मकता, आशा आणि आव्हानाना तोंड देऊन बाहेर येताना!
“सारे जग दु:खाने भरले आहे. ते सारे यातून सावरले देखील आहे”
“संधीसाधुता हा विश्वास आहे ज्यातून लक्ष्य गाठता येते. आशा आणि आत्मविश्वास नसेल तर काहीच होऊ शकत नाही”
“ व्यक्तिमत्व झटपट विकसित होत नाही, केवळ कार्यरत राहण्याच्या अनुभवातून आणि आत्म्याच्या दु:खातून मनाला बळकटी येते, महत्वाकांक्षा जाग्या होतात आणि यशश्री मिळवली जाते.”
“एकट्याने आपण थोडे कार्य करू पण एकत्र येऊन केल्यास मोठे कार्य घडते”.
“कोणाही भविष्यवेत्याने अजून ता-याचे गुपित सांगितले नाही, किंवा अस्तित्वात नसलेली जमीन विकली नाही, किंवा माणसाच्या मानवीवृत्तीचे दरवाजे उघडले नाहीत”
“जग चालत आले आहे, केवळ आदर्श व्यक्तींची उदाहरणेच दिली जातात असे नव्हे तर प्रत्येक प्रामाणिक कार्यकर्त्याच्या चांगल्या कामांना गती मिळाली आहे”
तुम्हाला काय करावेसे वाटते
“जगातील सर्वात सुंदर आणि उत्कृष्ट गोष्ट म्हणजे, जगाने स्पर्शातून नव्हे तर मनात कल्पना करून अनेक गोष्टी अनुभवल्या आहेत”
“ एकेकाळी मी केवळ स्थिरता आणि अंधार पाहिला आहे. . . माझे जीवन भविष्य आणि भुतकाळाशिवाय होते. . . . पण बोटांनी लहानश्या शब्दाला स्पर्श केला आणि रिकामेपणाची पकड हाती आली, आणि माझ्या मनात जगण्याचा नवीन आनंद निर्माण झाला.”
“खराखुरा आनंद. . . हा स्वत:साठी खूप काही करण्यात नसतो, तर गरजवंताच्या कामी येण्यात असतो”.
“ तुमचे यश आणि आनंद तुमच्यावर अवलंबून असतो. आनंदी राहण्याचा प्रयत्न करा, आणि तुमच्या खुशीने तुम्ही कठीणातल्या कठीण अडचणीमधून सहीसलामत सुटाल”
शिक्षण आणि शिकवण
“ प्रत्येक गोष्टीत तीच्या चमत्कृती असतात, अगदी अंधार आणि स्तब्धते मध्येही, आणि मी शिकले आहे की जे काही माझ्याजवळ आहे त्यात काहीतरी नक्कीच आहे.”
“आंधळे असण्यापेक्षा एकच वाईट गोष्ट आहे, दृष्टी आहे पण दृष्टीकोन नाही”
“शिक्षणाचा सर्वात मोठा फायदा आहे सहिष्णुता”
हेलन केलर दिनाची सर्वात मोठी शिकवण ही आहे की, अंधारातून आणि निराशेतून बाहेर या, अज्ञानातून, भयातून ज्ञान, सुज्ञता सकारात्मकतेच्या प्रकाशात या.