India Languages, asked by SwaraliJaipurkar, 4 months ago

information about sunflower in marathi please fast​

Answers

Answered by Anonymous
8

here

➡ ., गु. सूरजमुखी इं. सनफ्लॉवर लॅ. हेलिअँथस ॲन्यूस कुल-कंपॉझिटी). ही मोठी ओषधी वनस्पती मूळची पश्चिम अमेरिकेतील असून सर्वत्र पसरली आहे. सूर्यफूल रानटी अवस्थेत आढळत नाही. ते मूळचे मेक्सिकोतील हेलिअँथस लेंटिक्युलॅरिस या वन्य जातीपासून उत्पन्न झाले असावे असे मानतात. फार पूर्वीपासून शोभेकरिता सूर्यफूल लागवडीत आहे आणि त्याचे वर्षायू व बहुवषार्यू असे दोन्ही प्रकार बागेत आढळतात. हे. ॲन्यूस, हे. अर्गोफिलस व हे. डेबिलिस या जाती अनुक्रमे पेरु, टेक्सस (अ.सं.स.) आणि उत्तर अमेरिका या ठिकाणी शोभेकरिता लावलेल्या आढळतात. तसेच संकर पद्घतीने सूर्यफुलाचे अनेक प्रकार तयार करण्यात आले आहेत.

गळिताचे व चाऱ्याचे पीक म्हणून सूर्यफुलाचे बरेच महत्त्व आहे. भारत, रशिया व ईजिप्त या देशांमध्ये तेलबियांकरिता याची लागवड करतात. अमेरिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, चीन, जर्मनी, इटली इ. ठिकाणी कमी प्रमाणात याची लागवड करतात. याच्यापासून मुरघास किंवा ओला चारा तयार करतात.

सूर्यफुलात तेलाचे प्रमाण ४५–५०% असल्यामुळे थोड्या क्षेत्रात व कमी वेळात या पिकापासून अधिक तेल मिळू शकते. हे तेल आहाराच्या दृष्टीने फारच चांगले आहे. हे पीक कमी मुदतीचे (७०–८० दिवसांचे ) आहे. या पिकाची लागवड सुधारित तंत्राने केल्यास भरपूर फायदा होऊ शकतो. जिरायती पिकापासून हेक्टरी ८–१२ क्विंटल आणि बागायती पिकापासून हेक्टरी १५–२० क्विंटल उत्पादन मिळते. भारतातील सूर्यफूल लागवडीखालील क्षेत्रापैकी जवळ-जवळ ७०% क्षेत्र महाराष्ट्र राज्यात आहे.

हवामान : सूर्यफुलाचे पीक खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामांमध्ये घेता येते. कारण हवेतील तापमान व सूर्यप्रकाशाचा कालावधी यांचा या पिकाच्या वाढीवर फारसा परिणाम होत नाही

जमीन : या पिकाची लागवड हलकी, मध्यम व भारी अशा सर्व प्रकारच्या जमिनीत करता येते. जमीन शक्यतो उत्तम निचऱ्याची असावी

Similar questions