Science, asked by saurbhmoynak02, 11 months ago

Information of chandra grahan( lunar eclipses) in Marathi. Please give ma answer fast, you will get 50 points. ​

Answers

Answered by nilesh102
1

hi mate,

ग्रहण म्हणजे अवकाशात घडणारा प्रकाश-सावलीचा, आणि खगोलांच्या सापेक्ष स्थानांचा खेळ. जेव्हा निरीक्षक सापेक्ष एक खगोलीय वस्तू दुसऱ्या खगोलीय वस्तूच्या आड येते, म्हणजेच निरीक्षकासाठी पहिली वस्तू दुसऱ्या वस्तूला झाकते, तेव्हा पहिल्या वस्तूने दुसऱ्या वस्तूला ग्रहण लावले असे म्हणतात

जेव्हा पृथ्वी ही सूर्य व चंद्राच्या मध्ये येते, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण दिसते. चंद्रग्रहण ही एक पूर्णत: वैज्ञानिक खगोलीय घटना आहे. चंद्रग्रहण साधारणपणे पौर्णिमेच्या आसपास दिसते. चंद्रग्रहण प्रत्येक पौर्णिमेस लागत नाही, कारण चंद्रकक्षा व क्रांतिवृत समपातळीत नसून त्यांच्या पातळयांमध्ये ५ अंशांचा ९' चा कोन आहे.

सूर्यप्रकाशामुळे पडणारी पृथ्वीची सावली ही प्रछाया व उपछाया अशी दोन प्रकारची असते. प्रछाया ही सावलीच्या मध्यभागी व उपछाया प्रछायेच्या भोवती असते. प्रछायेत सूर्यकिरणे अजिबात नसतात. उपछायेत मात्र सूर्यकिरण सुर्याच्या एका भागातून येतात.

चंद्र परिभ्रमण करत प्रथम उपछायेत येतो. त्यावेळी चंद्रप्रकाश कमी होतो. यालाच ग्रहणाचे वेध लागले असे म्हणतात.

त्यानंतर चंद्र प्रछायेत येतो तेव्हा चंद्राचा भाग झाकाळलेला दिसतो. तेव्हा चंद्रग्रहण लागले असे म्हणतात.

कालांतराने चंद्र प्रछायेतून बाहेर पडतो व पुन्हा प्रकाशित होतो. तेव्हा ग्रहण सुटले असे म्हणतात. त्यानंतर काही काळ चंद्र उपछायेत असतो तेव्हा त्याचा प्रकाश कमी असतो.

काही वेळाने जेव्हा चंद्र उपछायेतून बाहेर पडतो तेव्हा पौर्णिमेचा चंद्र नेहमीसारखा प्रकाशमान होतो. चंद्रग्रहणे पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्यामुळे दिसतात.

i hope it helps you.

Answered by BrainlyTornado
1

खगोल शास्त्रानुसार चंद्रग्रहण ही निव्वळ खगोलीय घटना आहे. परिक्रमा पूर्ण केल्यानंतर पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्यामध्ये येते तेव्हा चंद्र झाकला जातो आणि चंद्रग्रहण पाह्यला मिळते. जेव्हा सूर्य आणि चंद्राच्या दरम्यान पृथ्वी येते तेव्हा सूर्याची किरणं चंद्रापर्यंत पोहोचत नाही. त्यावेळी चंद्रग्रहण लागलं असं मानलं जातं. पृथ्वीच्या चोहोबाजूला फिरणारा चंद्र हा पृथ्वीचा एक उपग्रह आहे. धार्मिक मान्यतेनुसार चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण राहू केतूमुळे होते. सूर्य आणि चंद्राला राहू आणि केतू शत्रू मानतात. त्यामुळे अमावस्येच्या दिवशी सूर्य आणि पौर्णिमेच्या दिवशी चंद्र झाकला जातो, अशी धार्मिक मान्यता आहे. ग्रहणाच्या दिवशी खाण्यापिण्यापासून ते पूजाअर्चा करण्यापर्यंतची अनेक बंधनं धार्मिक मान्यतेनुसार टाकण्यात आली आहेत.

Similar questions