English, asked by kaajuu7838, 1 year ago

Information of lily in marathi
Information of Lily in Marathi

Answers

Answered by NishitaNishu
4
) महापद्म : (१) तरंगणारी पाने, (२) फूल; (आ) ॲमेझॉन लिली : (१) पान, (२) फूल.
लिली : फुलझाडांपैकी वनस्पती, आवृतबीज उपविभाग, लिलीयम या प्रजातीतील वनस्पतींचे सामान्य इंग्रजी नाव; तथापि इतर कित्येक प्रजातीतील काही वनस्पतीही याच नावाने ओळखल्या जातात. लिलियम या प्रजातीत सु. ८०-१००जाती आहेत. त्या सर्व ओषधी (नरम व लहान वनस्पती ) असून त्यांना फांद्या नसतात व जमिनीत कंद (मांसल खवल्यांनी बनलेली रूपांतरित खोडे) असतात. त्यांचा प्रसार मुख्यतः उ. गोलार्धातील समशीतोष्ण कटीबंधात आहे. पुष्कळ जातींची शोभेसाठी लागवड करतात. सु. १२ जाती हिमालयातील उष्ण व समशीतोष्ण कटिबंधीय पट्ट्यात व द. भारतात डोंगराळ भागात आढळतात. बऱ्याच विदेशी जाती व प्रकार भारतात उद्यानांत लावतात त्यांचे आकार-प्रकार, फुलांचे रंग, सुवास व काहींची उपयुक्तता यांमुळे यांचे महत्त्व वाढत आहे. त्या बहुवर्षायू (अनेक वर्षे जागणाऱ्या) असून त्यांच्या योग्य वाढीसाठी वर्षभर भरपूर पाणी देणे आवश्यक असते. डोंगरावरील थंड वातावरण त्यांना मानवते. हलक्या किंवा भारी व चांगल्या निचऱ्याचच्या रेताड किंव चिकण जमिनीत लिली चांगल्या वाढतात; परंतु जमिनीत चुनखडी नसावी. थोडी सावलीही आवश्यक असते. अभिवृद्धी(लागवड) बिया,कंद, शल्क (खवले), अपप्ररोह (लहान, जाड व जमिनीवर आडवी वाढणारी व टोकास नवीन वनस्पती निर्मिणारी शाखा) इत्यादींनी होते.

I hope the answer is clear.....

Pls mark me as brainlist ❤️❤️❤️♥️♥️♥️♥️
Similar questions