India Languages, asked by Pujithachinni9389, 11 months ago

Integrity A Way of Life essay in Marathi translation

Answers

Answered by halamadrid
0

■■प्रामाणिकपणा- एक जीवनपद्धती (integrity- a way of life)■■

प्रामाणिकपणाला आपली जीवनपद्वती बनवली तर आपले जीवन धन्य होईल.जर आपण आपले जीवन प्रामाणिकपणाने जगलो,तर आपले विचार सकारात्मक होतील,आपल्याला आपल्या कामात नक्कीच यश मिळवता येईल.

प्रामाणिकपणाने आपण विश्वासास पात्र बनू शकतो.जर आपण प्रामाणिकपणाने काम केले,तर आपल्याला लोकांचे विश्वास आरामाने जिंकता येईल.जर आपण आपल्या कामात लबाडी केली,तर लोक आपल्यावर विश्वास करणार नाही.

लबाडी केल्यामुळे लोक आपल्याला काम देणार नाहीत व यामुळे कामात आपली प्रगती होण्यापेक्षा अधोगती होईल.

प्रामाणिकपणाने जीवन जगल्यावर आपल्याला खूप फायदे होतील. आपल्याला समाजात आदर मिळेल,चांगले व विश्वासू मित्र मिळतील.

प्रामाणिकपणामुळे आपला आत्मविश्वास वाढतो,आपल्यामध्ये नेतृत्व कौशल्ये निर्माण होतात.

प्रामाणिक माणूस इतरांच्या भल्यासाठी विचार करतो,तो दुसऱ्यांना त्यांच्या कामात मदत करतो.दुसऱ्यांनासुद्धा आपल्यासारखेच कामात यश मिळावे असे त्याला वाटत असते.

प्रामाणिकपणा हा सर्वोत्तम गुण आहे आणि म्हणून आपण प्रामाणिकपणाने आपले जीवन जगलेच पाहिजे.

Similar questions