India Languages, asked by swarajwaghmare20, 6 months ago

इराणी शाखेच्या किती अवस्था आहे.?​

Answers

Answered by akankshakamble6
2

Answer:

इराण : पश्चिम आशियातील एक इस्लामी राष्ट्र. क्षेत्रफळ १६,४८,००० चौ. किमी. लोकसंख्या ३,०१,५१,२७५ (१९७१ अंदाज). सीमांची लांबी ४,४१८ किमी. विस्तार २५० उ. ते ४०० उ. आणि ४४० पू. ते ६३० पू. इराणच्या उत्तरेस रशिया वा कॅस्पियन समुद्र, पूर्वेस अफगाणिस्तान व पाकिस्तान, दक्षिणेस इराणचे व ओमानचे आखात आणि पश्चिमेस इराक व तुर्कस्तान हे देश आहेत. इराणच्या आखातातील हॉर्मझ, लाराक, किश्म, हेंगाम, फोरूर, क्वैस, हेंडोराबी, शेखसार, शेख शोएब, खार्क व खार्कू अशी अनेक बेटे इराणच्या मालकीची असून बहरीन बेटांवरही तो आपला ताबा सांगतो. १९३५ पासून हा देश पर्शियाऐवजी इराण म्हणून ओळखला जाऊ लागला.

भूवर्णन: इराणी पठाराचा पश्चिमेकडील दोन तृतीयांश भाग इराण देशाने व्यापला असून, हे पठार म्हणजे आल्प्स-हिमालय ह्या वलीकृत पर्वतश्रेणींचा एक महत्त्वाचा भाग समजले जाते. कुह-इ-दिनारमध्ये तसेच झॅग्रॉस पर्वतराजीत आढळणारे तांबड्या व हिरव्या रंगांचे शैल हे कॅंब्रियन युगातील मानतात. जुना तांबडा वालुकाश्म वायव्य, उत्तर व पूर्व इराणमध्ये पुष्कळ प्रमाणात सापडतो. टेथिस समुद्राखाली हा प्रदेश प्राचीन काळी असताना, ह्या वालुकाश्माचे जाड, काळ्या कार्बनयुक्त चुनखडीत रूपांतर झालेले होते. ट्रायासिक काळात सामुद्रीय अवसादन झाले होते. लोअर जुरासिक काळात झॅग्रॉसमध्ये मोठ्या प्रमाणात चुनखडीचे साठे उपलब्ध होते. एल्बर्झ पर्वतातही लाव्हारसाचे उद्रेक झालेले होते. इराणमधील बाख्तियारी पर्वतसमूह, उंचावलेले आखातीय किनारे आणि भ्रंशरेखा, यांवरून मुख्य पर्वतराजी फ्लायोसीन युगातीलच दिसतात. फ्लायोसीन युगात आझरबैजान (कुह-ए-साबालान, कुह-ए-सहांद पर्वत), एल्बर्झ (डेमॅव्हेंड पर्वत), केरमान (कुह-ए-हाझारान, कुह-ए-लालेह झार पर्वत) व बलुचिस्तान (कुह-ए-ताफ्तान, कुह-ए-बाझमान) या ठिकाणी ज्वालामुखीक्रिया घडल्याचे आढळते. अजूनही इराणमध्ये भूकंप होतातच. पश्चिमेस व आग्‍नेयीस पर्वतराजी रुंदावलेल्या असून त्यांना झॅग्रॉस पर्वतश्रेणी असे संबोधतात. सरासरी २,४४० ते ३,०५० मी. पासून ३,६६० ते ३,९६० मी. पर्यंत उंच पर्वतशिखरे या श्रेणीत आढळतात. उत्तरेकडील एल्बर्झ पर्वतराजीत डेमॅव्हेंड ५,६६२ मी. व आलम कूह ४,८३६ मी. ही सर्वोच्च शिखरे आहेत. अंतर्भागात मोठे पठार असून विस्तीर्ण दऱ्या तसेच घळ्या आहेत. पर्वतरांगा वायव्येकडून आग्‍नेयीकडे पसरलेल्या आहेत. पूर्वेकडे, उत्तर-दक्षिण असा एक मार्ग इराणी पठार व अफगाण-बलुची पठार ही एकमेकांपासून अलग करतो. वायव्येपासून आग्‍नेयीकडे दर्‍या व घळ्या यांची उंची १,२२०–१,८२० मी. पासून ४५६–३०० मी. इतकी खाली येते. झॅग्रॉस व एल्बर्झ पर्वतश्रेणी इंग्रजी ‘व्ही’ अक्षराप्रमाणे पसरलेल्या आहेत. एल्बर्झ पर्वतश्रेणी व बलुचिस्तान यांमध्ये मोठी वाळवंटे आहेत. त्या भागाच्या वायव्येस-दश्त-इ-कावीर व आग्‍नेयीस दश्त-इ-लूत या दोन्ही वाळवंटांच्या दरम्यान अनेक मरूद्याने आहेत. त्यांपैकी ‘ताबास’ हे सर्वांत प्रसिद्ध आहे. आरास, साफिद रूद, आत्रेक ह्या नद्या उत्तरेकडील पर्वतांतून, तर पश्चिमेकडील पर्वतांतून कारखेह, देझ, कारून व मांड ह्या नद्या उगम पावतात. अंतर्भागातून कारासू, रूद ए कूम, झायांदेह रूद, कोर, कालशूर ह्या नद्या उगम पावतात. हंगामी प्रवाहही पुष्कळ आहेत. कारून हीच काय ती वाहतुकीस योग्य (११२ किमी. पर्यंत) नदी आहे. इतर नद्या अतिशय उंचीवरून खाली वहात येत असल्यामुळे त्यांचा वाहतुकीस उपयोग नसला, तरी त्यांच्या जोरावर वीज निर्माण केली जाते. उर्मिया सरोवर, कॅस्पियन, इराणचे आखात व मध्य वाळवंट यांकडे नद्या वहात जातात.

Similar questions