History, asked by PJAWALE, 3 months ago

इतिहास संशोधन पद्धतीत इतिहासाची मांडणी करण्याचे टप्पे लिहा.​

Answers

Answered by ankita784938
1

Explanation:

कोणतीही व्यावसायिक संस्था चालवण्यासाठी व वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त असलेला विषय म्हणजे ‘संशोधनाच्या पद्धती’ (‘रिसर्च मेथड्स किंवा रिसर्च मेथॉडॉलॉजी). काही विद्यापीठांमधून याला बिझनेस रिसर्च मेथड्स असेही म्हटले जाते. तसेच हा विषय पहिल्या वर्षीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या सेमिस्टरमध्ये शिकवला जातो. या विषयाचा अभ्यास करताना काही वेळा विद्यार्थ्यांची भावना अशी असते की, या विषयाचा आम्हाला काय उपयोग? या विषयाकडे दुर्लक्ष होऊन फक्त परीक्षेत उत्तीर्ण होणे हेच उद्दिष्ट ठेवले जाते आणि त्यामुळे विषयाचा पाया कच्चा राहून पुढे करिअरमध्ये अडचणी येऊ शकतात. यामुळे असे लक्षात घ्यायला हवे की संशोधनाचा वापर हा प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे. व्यवस्थापनाच्या कोणत्याही विभागामधे, मग ते वित्तीय व्यवस्थापन (फायनान्शिअल मॅनेजमेंट) असो किंवा विपणन व्यवस्थापन (मार्केटिंग मॅनेजमेंट) असो अथवा इतर विभाग म्हणजे मनुष्यबळ विकास, उत्पादन व्यवस्थापन, संगणक विभाग इ. या प्रत्येक विभागामध्ये संशोधनाचे महत्त्व मोठय़ा प्रमाणावर आहे. व्यवस्थापनाला कोणताही निर्णय घ्यायचा असेल आणि जर तो संशोधनावर आधारित असेल तर तो चुकण्याची शक्यता कमी असते. मार्केटिंगमधे ग्राहकाचे मानसशास्त्र, जाहिरातींचा परिणाम अशा अनेक महत्त्वाच्या विषयांत संशोधनाचा उपयोग होतो. तसेच वित्तीय संदर्भात कंपन्यांची नफा मिळवण्याची क्षमता, उत्पादन, इतर खर्च कमी करण्याचे उपाय या आणि इतर अनेक महत्त्वाच्या विषयांवर संशोधन करून योग्य निर्णय घेता येतात. संशोधन हा व्यवस्थापनाचा एक अविभाज्य घटक आहे. त्या दृष्टीनेच या विषयाकडे पाहणे उचित ठरेल.

संशोधन कसे करावे हेही समजणे गरजेचे ठरते. कोणत्याही विषयामधे संशोधन करताना ते शास्त्रीय पद्धतीने केले तरच त्याचा उपयोग होतो. अन्यथा चुकीच्या पद्धतीवर आधारलेल्या संशोधनातून चुकीचे निष्कर्ष निघतात व त्याचा लाभ कोणालाच होत नाही. म्हणून संशोधन करण्याची पद्धत व प्रक्रिया नीट समजून घ्यायला हवी. संशोधनाची प्रक्रिया ही या विषयाचा गाभा आहे. सांख्यिकी संशोधन, गुणात्मक संशोधन, मूलभूत संशोधन तसेच संबंधित संशोधन आणि इतर प्रकार हे संशोधनाचे वेगवेगळे प्रकार आहेत.

संशोधनाच्या प्रक्रियेचा सुरवातीचा भाग म्हणजे ज्या प्रश्नावर संशोधन करायचे तो प्रश्नच मुळात समजायला हवा. उदा. एखाद्या संस्थेमध्ये कामगारांची उत्पादकता कमी होणे हा एक प्रश्न असेल किंवा एखाद्याला रिस्क मॅनेजमेंट या विभागामध्ये एखादा प्रश्न दिसेल. म्हणजेच आपण कोणत्या प्रश्नावर संशोधन करणार आहोत याविषयी स्पष्ट कल्पना असणे गरजेचे आहे. एम.बी.ए.च्या अभ्यासक्रमामध्ये ज्या वेळी प्रकल्प अहवाल तयार केला जातो, त्या वेळीसुद्धा आपण ज्या कंपनीमध्ये प्रकल्प करणार आहोत त्यामध्ये कोणता प्रश्न आहे हे समजायला हवे.

एकदा प्रश्न समजला की संशोधनाचे उद्दिष्ट किंवा उद्दिष्टे निश्चित करणे सोपे जाते. अर्थात यामधला महत्त्वाचा भाग असा की उद्दिष्टे निश्चित करण्यापूर्वी आपण संशोधन करणार असलेल्या प्रश्नावर याआधी कुणी संशोधन केले आहे का, याचा आढावा घेणे गरजेचे आहे. यालाच ‘रिव्ह्य़ू ऑफ लिटरेचर’ असे म्हणतात. अगोदरच्या संशोधनाचा आढावा घेण्यामागे असा उद्देश आहे की, यामुळे आधीच्या संशोधनाची माहिती मिळते व कोणत्या बाबींवर संशोधन झालेले नाही, हेही समजते. यामुळे आपल्या संशोधनाची उद्दिष्टे काय असावीत हे निश्चित करता येते. यामुळे संबंधित विषयावर प्रकाशित झालेले शोधनिबंध, इतर लेख, पीएच.डी.चे प्रबंध इ. अनेक मार्गाचा वापर करून आधीच्या संशोधनाचा आढावा घेता येतो आणि संशोधन न झालेल्या विभागावर लक्ष केंद्रित करून संशोधनाची उद्दिष्टे ठरवता येतात.

Answered by sakahilahane23
1

भूतकाळातील घडून गेलेल्या घटनांशी क्रमाने सुसंगत लावून त्याचे आकलन करून घेण्याच्या उद्देशाने इतिहास संशोधन व लेखन केले जाते आणि ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे

2) यानुसार इतिहासाची मांडणी पुढील टप्प्याने अनुसरून केली जाते

इतिहासाच्या साधनाचे चिकित्सा उपलब्ध करणे उपलब्ध झालेल्या ऐतिहासिक माहितीचे संदर्भ तपासणे

इतिहासिक माहिती संकल्पण करणे ऐतिहासिक बदलांना कारणीभूत ठरणाऱ्या प्रक्रियेचे स्वरूप अधोरेखित करणे व त्याच्या तुलनात्मक विश्लेषण करणे

विशिष्ट ऐतिहासिक घटनांविषयी उपलब्ध माहितीचे आत्मक संदर्भ आकलन करणे शिवाय ऐतिहासिक अभ्यास पद्धतीचे विविध संख्यात्मक चौकटी आकलन करून घेणे

ऐतिहासिक संदर्भाशी निगडीत योग्य अशा प्रश्नांची

Similar questions