Business Studies, asked by bholesushil05, 4 months ago

जागतिकीकरण फायदे स्पष्ट करा.​

Answers

Answered by junali007
5

Explanation:

जग ही एक बाजारपेठ असणे जागतिकीकरणाचे ध्येय आहे , परकीय क्षेत्राचे उदारीकरण केल्यास औदयोगिक उत्पादने आपोआप परकीय क्षेत्राशी जोडली जातात , त्यामुळे अप्रत्यक्षपणे बॅंकिंग आणि सेवाक्षेत्रही परकीय क्षेत्राकडे आकर्षित होतात . विविध देशांची परकीय क्षेत्रे एकमेकांशी निगडीत असल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थाही एकमेकांशी संलग्न होतात , जागतिकीकरण होऊ लागते , उत्पादनाचे वितरण स्थानिक स्तरापर्यंत होत असेल तर त्याला स्थानिकीकरण असे संबोधतात , याउलट उत्पादनाचे वितरण देशादेशामध्ये होत असेल, तर त्याला आंतरराष्ट्रीयकरण असे म्हणतात ,परंतु जागतिकीकरण आंतरराष्ट्रीयीकरणापेक्षा मोठी आणि व्यापक संकल्पना आहे .जागतिकीकरणात फक्त उत्पादनाचे वितरणच नाही तर त्यासोबत बाजार ,नियम , कररचना , आयातशुल्क , साहाय्य,विक्री , व्यापार संघटन , तोडगा अशा व्यवसायाशी निगडीत सेवांचा देखील समावेश असतो, आंतरराष्टीयकारणात राष्ट्र एकक मानून उत्पादनांची देवाणघेवाण होते , जागतिकीकरणात व्यापाराच्या दृष्टीने राष्ट्रांच्या सीमा फिकट होतात , त्या इतक्या फिकट होतात की, व्यापाराच्या दृष्टीने स्थलांतर आणि भांडवलाचे मुक्त वहन होऊ लागते.

Similar questions