India Languages, asked by khushiparab484, 6 months ago

जुन्या मोबाईलचे आत्मवृत्त मराठी मध्ये​

Answers

Answered by pratibhakashte
13

Answer:

Mobile chi atmakatha: मित्रहो आजच्या काळात मोबाइल एक अत्यंत उपयुक्त साधन बनले आहे. आजच्या या लेखात आपण एक मोबाइल ची आत्मकथा  पाहणार आहोत. या लेखाद्वारे मोबाइल चे मनोगत मांडले आहे.  

Mobile chi atmakatha

मोबाइल चे मनोगत / आत्मकथा मराठी निबंध | Mobile chi atmakatha/ manogat in marathi 

माझा जन्म जवळपास 45 वर्षांआधी झाला होता. आणि आज मी तुमच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनलो आहे. तुम्ही माझा उपयोग दिवसभरातून अनेक वेळा करीत असतात. काही लोकांना तर माझ्याशिवाय चैनच पडत नाही. मी मोबाईल बोलतोय... होय, तुमच्या हातात असणारा मोबाईल फोन. आणि आज मी तुम्हाला माझी आत्मकथा सांगणार आहे. मी खूप लांब प्रवास करून आजच्या स्थितीपर्यंत आलो आहे. मी वर्तमान युगाला आधुनिक सुविधांनी सुसज्ज केले आहे. आज माझ्या शिवाय दैनंदिन कार्याची कल्पना देखील करता येत नाही. 

माझा शोध सर्वात आधी मोटोरोला कंपनीचे शोधक मार्टिन कूपर यांनी इ.स. 1973 साली लावला होता. त्यांना माझे जनक म्हणून ही ओळखले जाते. खूप गहन अभ्यास आणि अनेक वर्षाच्या परिश्रमानंतर माझे निर्माण करण्यात आले. त्या काळात मी आज एवढा विकसित नव्हतो. नंतरच्या काळात वेगवेगळ्या मोबाईल कंपन्या उदयास आल्या ज्यांनी माझ्या स्वरूपात बदल करीत माझे प्रगत रूप बाजारात आणले. 

सॅमसंग, नोकिया, एम आय, मायक्रोमॅक्स, इंटेक्स अश्या अनेक मोबाईल कंपन्यांनी आपले मोबाईल बाजारात आणले आहे. परंतु मला ज्या कंपनीत बनवण्यात आले त्या कंपनीचे नाव समसंग आहे. सॅमसंग कंपनीत तयार झालेले मी एक प्रसिद्ध मोबाईल मॉडेल होतो. त्यावेळी माझी किंमत 20 हजारांच्या आसपास होती. सॅमसंग च्या इंजिनीअर्सने मला आपल्या कंपनीत बनवले होते. माझ्यासोबतच माझ्या माझ्यासारखेच अनेक बंधू बनवण्यात आले. नंतरच्या काळात आम्हा सर्वांना बाजारात विक्रीसाठी आणण्यात आले. 

शहरातील एका प्रसिद्ध मोबाईल दुकानात मला सजवून ठेवण्यात आले. या दुकानात दिवसभरातून अनेक ग्राहक येत असत. मी वाट पाहत होतो की लवकरच कोणीतरी येईल व मला विकत घेईल. परंतु 15 ते 20 दिवस झाले, माझ्यासोबतचे इतर मित्र निघू लागले. पण माझ्या भूर्या रंगामुळे मला कोणीही घेत नव्हते. शेवटी एक महिना झाला. आता माझ्या सोबत तयार झालेले माझे सर्व मित्र मोबाईल आपापल्या नवीन मालकासोबत निघून गेले होते. मी मात्र दररोज कोणीतरी मला नेईल या आशेने टक लाऊन पाहत बसायचो. 

Explanation:

plss I have brailylist mark plssss

Similar questions