ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेबद्दल केलेली प्रतिज्ञा *
मराठी संस्कृत पेक्षा थोर आहे
मराठी भाषा नवरत्नांची खाण आहे
मराठीतून अमृताशी पैजा जिंकणारी रसाळ अक्षरे मी निर्माण करीन
Answers
Answer:
संत ज्ञानेश्वर (जन्म : आपेगाव-पैठण, श्रावण कृष्ण अष्टमी, इ.स. १२७५; संंजीवन समाधी : आळंदी, इ.स. १२९६) हे १३ व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी. भागवत संप्रदायाचे प्रवर्तक, योगी व तत्त्वज्ञ होते. भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी), अमृतानुभव, चांगदेवपासष्टी व हरिपाठाचे अभंग ह्या त्यांच्या काव्यरचना आहेत. अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाविषयक विचार मराठीतूनही व्यक्त करता येतात असा विश्वास संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथकर्तृत्वातून निर्माण केला. त्यामुळे समाजातील सर्व थरांतील लोकांना आध्यात्मिक प्रेरणा मिळाली.
ज्ञानेश्वरांनी आपल्या काव्यरचना करताना बाप विठ्ठलसुत, बाप रखुमाईवर, ज्ञाना, ज्ञानाबाई, आणि ज्ञानदेव ही नावेही वापरली आहेत. ज्ञानेश्वरीच्या अखेरीस ज्ञानेश्वरांनी स्वतःची नाथसंप्रदायाची गुरुपरंपरा सांगितली आहे, ती अशी : आदिनाथ → मत्स्येंद्रनाथ → गोरक्षनाथ → गहिनीनाथ → निवृत्तिनाथ → ज्ञानेश्वर
(ज्ञानेश्वर)
मूळ नाव-ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी
समाधिमंदिर-आळंदी जि.पुणे
संप्रदाय-नाथ संप्रदाय, वारकरी,वैष्णव संप्रदाय
गुरू-निवृत्तिनाथ
भाषा-मराठी
साहित्यरचना-ज्ञानेश्वरी (भावार्थदीपिका), अमृतानुभव, हरिपाठ, अभंग भक्ति कविता
व्यवसाय-संत, समाजजागृती
वडील-विठ्ठलपंत कुलकर्णी
आई-रुक्मिणीबाई