Art, asked by like19, 5 hours ago

२) ज्वालामुखी हि संकल्पना स्पष्ट करा.
BA/bcom​

Answers

Answered by likefreefire1
1

(२) ज्वालामुखी

ज्वालामुखी ही भूकवचात असलेली भेग असून, उद्रेकाच्या वेळी या भेगेतून खडकांचे तुकडे, लाव्हारस, राख, पाण्याची वाफव अन्य वायू बाहेर पडत असतात. क्षीण भूकवच झालेल्या भागात अशा भेगा आढळतात किंवा निर्माण होतात. असे हे धन व वितळलेल्या स्वरूपातील द्रव्य भेगेच्या मुखाशेजारी साचून ज्वालामुखीचा शंकू निर्माण होतो, किंवा त्याला एखाद्या टेकडी वा पर्वताचा आकार प्राप्त होतो व त्याचा आकार शंकूसारखा होतो.

नरसाळ्यांच्या आकाराचा खळगा टेकडीच्या माथ्यावर असतो व त्यातूनच वरील विविध प्रकारचे द्रव्य बाहेर पडत असते. या खळग्याला ज्वालाकुंड (crate) म्हणतात. जपानमधील फ्युजियामा, इटलीतील व्हेव्हियस, इफेडॉरमधील कोरोपॅक्सी ही ज्वालामुखीची उदाहरणे होत. बंगालच्या उपसागरातील अंदमान बेटांच्या पूर्वेकडील बॅरन बेट हे ज्वालामुखीच्या टेकडीचे उदाहरण आहे. उद्रेकांच्या पुनरावृत्तीनुसार ज्वालामुखींचे जागृत, निद्रिस्त व मृत असे तीन प्रमुख प्रकार पडतात. वारंवार उद्रेक होणान्या ज्वालामुखीस 'जागृत ज्वालामुखी' (Active Volcano) म्हणतात. पूर्वी कधीतरी उद्रेक झालेला व नंतर बराच काळ उद्रेक झालेला नसेल; पण पुढे होण्याची शक्यता असेल तर अशा ज्वालामुखीस 'निद्रिस्त ज्वालामुखी' (Dormant or Sleeping Volcano) म्हणतात. ज्या ज्वालामुखीतून ऐतिहासिक किंवा प्राचीन काळात उद्रेक झालेला असून, नंतर बराच काळपर्यंत उद्रेक झालेला नाही व पुढे होण्याची शक्यताही नसेल तर अशा ज्वालामुखीस 'मृत ज्वालामुखी' (Extinct Volcano) म्हणतात. बऱ्याच वेळा ज्वालामुखी हा निद्रिस्त अवस्थेत आहे की मृतावस्थेत आहे हे ओळखणे कठीण जाते. व्हेसुव्हियस व क्रॅकाटोआ हे बऱ्याच काळपर्यंत मृतावस्थे असल्यासारखे वाटत होते. पण अलीकडे त्यांत उद्रेक घडून • जावा व सुमात्रा बेटांमध्ये असलेल्या सुंडा सामुद्रधुनीतील क्रॅकाटोआ आलेत.

Similar questions