Biology, asked by dhandechaitanya0, 1 month ago


जैवतंत्रज्ञानातील घटकांची माहिती द्या.​

Answers

Answered by sumasamala29
0

Answer:

प्राचीन काळापासून जैवतंत्रज्ञान पद्धतीचा वापर दुधाचे दही करणे, इडली तयार करणे, मद्य तयार करणे इ. साठी होत आहे. या घटकात आपण जैवतंत्रज्ञान म्हणजे काय, त्याचा उपयोग त्याचे सामाजिक, आíथक परिणाम त्याची नतिक बाजू याचा अभ्यास करणार आहोत. जैवतंत्रज्ञान या विषयाची व्याप्ती व आवाका मोठा असल्याने जैवतंत्रज्ञानाची व्याख्या विविध प्रकारे करता येते. सजीवसृष्टीतील घटकांचा उदा. सूक्ष्मजीव, वनस्पती व प्राणी तसेच त्यापासून मिळणाऱ्या विविध उत्पादनांचा, शेती, मानवी आरोग्य, पर्यावरण संरक्षण इ. क्षेत्रात उपयोग करून घेणे हे जैवतंत्रज्ञानाच्या अंतर्गत येते. या जैविक घटकांचा आणि तंत्रज्ञानाची सांगड घालून मानवी जीवनमान उंचावणे हे या शास्त्राचे उद्दिष्ट आहे.

जैवतंत्रज्ञान म्हणजे जीवशास्त्र, रसायनशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र तसेच अभियांत्रिकीच्या संकल्पना यांचा एकत्रित वापर सूक्ष्मजीव, वनस्पती यांची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी करणे. थोडक्यात जैवतंत्रज्ञान म्हणजे जैविक प्रणाली व पद्धतींचा उपयोग तांत्रिकरीत्या करून मानवास उपयुक्त असे विविध उत्पादन करणे.

जैवतंत्रज्ञानाच्या अतंर्गत पुढील बाबींचा समावेश होतो

१) सूक्ष्मजीवांचा वापर करून घेणे. उदा. मळीपासून दारू तयार करणे, दुधापासून दही तयार करणे तसेच जिवाणूंचा वापर करून टाकाऊ पदार्थाची विल्हेवाट लावणे इ.

२) डी.एन.ए., प्रथिने इ. जैविक रेणूंचा वापर मानवी उपयोगासाठी करणे.

३) विशिष्ट पेशीद्रव्ये, जीवनसत्त्वे, लसी इ. चे उत्पादन करणे.

४) जनकीय बदल घडवन आणन हव्या त्या वनस्पती व प्राणी यांची निर्मिती/ हव्या त्या पदार्थाची निर्मिती करणे. उदा. जीवाणुंमध्ये जनुकीय बदल घडवून आणून त्यांचा वापर मानवी हार्मोन्स तयार करण्यासाठी करणे.

Explanation:

Hope this answer is helpful to you

mark it as brainlist

have a nice day

Similar questions