India Languages, asked by anushka3251, 1 year ago

जगण्यात मौज आहे . speech in marathi . please answer fast.

Answers

Answered by nikhil200519
8
बाल कवी म्हणतात. “आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोही कडे” (Anandi anand gade, jikade tikade chohikade) सर्वच जन सदैव सुख आणि आनंद मिळवण्यासाठी धडपडत असतात. आणि आपण सुखी व्हावे हि प्रत्येकाचीच इच्छा असते. सुख मिळाले कि आनंद होतोच अर्थात सुखाची कल्पना व्य्क्तीगनित बदलते. हा भाग वेगळा.
* आनंद काही मूर्त वस्तू नाही. बाजारात पैसे देऊनही ती मिळत नाही. (Happiness cant buy worth of money) व कुणा कडून मागूनही मिळत नाही. एखादा चिंताग्रस्त, दुर्मुखलेला मनुष्य जर म्हणेल, कि ‘काय करणार? माझ्या नशिबातच आनंद नाही. ‘तर ती चूक नशिबाची नसून त्याचीच असते. कारण आनंद मानून घेण्यावर असत. आनंद आपल्या सभोवार पसरलेला असतो. नुकतेच बोलता येऊ लागलेल्या मुलाचे बोबडे बोलणे, शाळेतून घरी आलेल्या मुलाकडून शाळेतील गमती-जमती एकने. खूप दिवसांनी भेटलेल्या मित्रा सोबत मनमुराद गप्पा मारणे, चांगले काम करून मोठ्या मानसान कडून शाबासकीची थाप मिळविणे. हे आपल्याच घरात मिळनारे  आनंदाचे क्षण आहे.
* प्रत्येक मनुष्या आपापल्यापरी आनंदाचा शोध घेत असतो. छंद हे आनंद मिलविण्याचे एक महत्वाचे साधन आहे. कुणाला तिकिटे जमविण्याचा छंद, तर कुणाला निरनिराळ्या वस्तू जमा करण्याचा छंद, कुणाला दुखीतांची सेवा करण्याचा छंद, तर कुणी आपल्या मधील कलादान करण्यात आनंद मानतात तर कुणी आपल्यातील विद्या दान करतात. पण कुठंही छंद आनंद देण्यात सारखाच समर्थ असतो. कलाकाराला आपल्या कलासाधनेतून एक वेगळाच आनंद मिळतो. ध्येयप्राप्तीमुळे तसेच कर्तव्यपुरतीतूनही आनंद मिळतो. आपलां मुलगा मोठा होऊन यशाच्या शिखरावर पोचलेला बघण्यात आईला मिळणारा आनंद केवळ अवर्णनीय असतो.
* आनंद हा ज्ञांनाप्रमाणे देण्याने वाढतो.दुसर्या माणसाला आपल्या आनंदात सहभागी करून घेतल्याने तो द्विगुणीत होतो. घरी आलेला एखादा आनंदी खेळकर पाहुणा संपूर्ण घर प्रसंन्न्तेने भरून टाकतो. त्यामुळे तेघ्रही त्याला अधिक आनंद देण्याचा प्रयत्न करते. आपण एखादी सुंदर वस्तू खरेदी केली असेल तर ती दुसर्याला दाखविल्या शिवाय चैन पडत नाही. आनंद भोगायला कोणाची तरी सोबत हवीशी वाटते. यामुळे  हवेलीत राहणार्या आणि सर्व सुखात लोळणार्या श्रीमंतांपेक्षा सडकेवर भटकणारा कलंदर माणूस जास्त आनंदी असू शकतो.
* निसर्ग हे आनंदाचे मूर्तिमंत प्रतिक आहे. निसर्ग कधी दु:खी असतो का? सकाळ होताच टवटवीत होऊन वार्यावर डोलणारी झाडे; किलबिल करणारे, मोहक हालचाली करणारे पक्षी; फुलांमध्ये बागडणारी फुलपाखरे; खळखळात करत धावणारी नदी हि सर्व निसर्गाची रूपे आपला आनंद उधळत असतात. “आम्ही आनंदी आहोत तुम्ही पण आनंदी व्हा” असाच संदेश जणू काही ती आपल्याला देत असतात.

* आनंदाची अशी अनेकविध रूपे आपल्याला ठायी ठायी दिसत असतात. आश्या परिस्थितीत दुखी राहणे म्हणजे पाण्यात राहून कोरडेच राहणे नव्हे का? ज्या प्रमाणे कावीळ झालेल्या माणसाला सारे जग पिवळे दिसते; त्याच प्रमाणे दु:खी माणसाला सारे जग दु:खी दिसते. म्हणून आनंदी होण्यासाठी एक उत्तम उपाय म्हणजे स्व:ताच्या दुखाचा विचार सोडून दुसर्याच्या दु:खाचा विचार करणे व ते कमी करण्याचा प्रयत्न करणे. अश्याप्रकारे आनंदाचे उगमस्थान हे मनच असते. म्हणून आनंद मिळण्यासाठी इकडे-तिकडे न भटकता. स्वत:च्या मनाशी त्याचा शोध घेतला पाहिजे. कवी बोरकरांच्या शव्दात सांगायचे झाले तर “अमृत घट भरले तुझ्या घरी का वणवण फिरशी बाजारी.”?
* हि सृष्टी आनंदातून निर्माण झाली आहे आणि तिचा विलय आनंदातच आहे असे उपनिषदांनी म्हटलेले आहे. मानव हाच आनंद स्वरूप आहे असे परमपुरुष म्हणतात.तसेच तुकाराम महाराज अध्यात्मिक आनंद प्रगट करताना म्हणतात .

“नंदाचे डोही । आनंद तरंग । आनंदची अंग । आनंदाचे ।।” आनंद स्वत: मध्येच शोधला पाहिजे, म्हणजेच मिळेल.!

Andachi Dohi , anand tarang, anandachi ang, anandache



Happiness & Sadnes


anushka3251: can you send me some quotes on this subject
Answered by vaishalishinde538
0

Answer:

खूप छान लिहिलं आहे ♥️☺️

Similar questions