जल हेच जीवन या विषयावर निबंध लिहा
Answers
आजच्या कार्यक्रमाला उपस्थितांना मी वंदन करते व माझ्या भाषणाला सुरुवात करते. जल म्हणजेच 'पाणी', सकाळपासून ते रात्रीपर्यंत सर्व कामात पाणी आपल्याला फार आवश्यक असते. सर्व सजीवांना जीवन जगण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. एक वेळेस अन्न मिळाले नाही तरी चालेल परंतु पाणी फार आवश्यक आहे. म्हणूनच पाण्याची तुलना अमृता सोबत केलेली आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब फार महत्त्वाचा आहे. पाण्यावर सर्व सजीवसृष्टी अवलंबून आहे. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आपण पाणी पितो, झाडांना, पशुपक्ष्यांना, जनावरांना पाण्याची आवश्यकता असते. आपली सर्व दैनंदिन कामे पाण्यावर अवलंबून आहेत. म्हणूनच पाण्याचा वापर जपून करावा. पाणी वाया घालवू नये, त्याचे योग्य नियोजन करून ते वापरावे, तरच पाणी टंचाईची भीषण समस्येला आपल्याला सामोरे जावे लागणार नाही. कारण 'जल हेच जीवन' एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो 'जय हिंद ! जय भारत !'