Environmental Sciences, asked by ovhalramesh523, 11 months ago

जलप्रदूषण विश्लेषण मराठी माहिती ​

Answers

Answered by kalyanibhagat92
45

Answer:

niche

Explanation:

जलप्रदूषण म्हणजे पाण्याच्या स्रोतांचे प्रदूषण. जलप्रदूषण ही एक मानव निर्मित समस्या आहे. हवा - पाणी -अन्न या माणसाच्या तीन गरजांपैकी पाणी हि दुसऱ्या क्रमांकाची गरज आहे. आपल्याला पाणी स्वच्छ आणि शुध्द मिळणे हे आरोग्याच्या द्रुष्टीने खुपच महत्त्वाचे आहे. प्रदुषित पाण्यामुळे पोटाचे विकार आणि इतर बरेचसे रोग होतात. पाणी प्रदुषित होण्याची अनेक कारणे आहेत आणि याला सर्वस्वी आपणच जबाबदार आहोत.

ही सर्व जगाला भेडसावणारी पर्यावरणीय गंभीर समस्या आहे. जल प्रदूषणामुळे पाण्यात विशिष्ट गुणधर्मांचे पदार्थ अशा प्रमाणात मिसळले जातात की, त्यामुळे पाण्याच्या नैसर्गिक गुणवत्तेत बदल होऊन ते वापरण्यास अयोग्य ठरते. जल प्रदूषणामुळे सजीवांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतात किंवा पाण्याची चव बिघडते, ते घाणेरडे दिसते वा दुर्गंधीयुक्त होते. मानवी कृती आणि अन्य कारणांमुळे पाण्याच्या नैसर्गिक गुणवत्तेत प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे बदल होतात आणि पाणी कोणत्याही कारणासाठी वापरण्यास अयोग्य ठरते. या पाण्याला प्रदूषित जल म्हणतात. पाण्याचे प्राकृतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म बदलल्याने मानव व जलीय सजीवांवर अपायकारक परिणाम करणारी जल प्रदूषण ही प्रक्रिया आहे. नैसर्गिक पाण्यात एखादा बाह्य पदार्थ अथवा उष्णता यांची भर पडल्यास ते पाणी प्रदूषित होऊन त्याचा मानव, इतर प्राणी आणि जलीय जीव यांना अपाय होतो. जगातील बहुतेक देशांत जल प्रदूषण ही गंभीर समस्या बनली आहे. कॅनडा, चीन, भारत, जपान, रशिया, अमेरिका इ. देशांत ही समस्या तीव्रतेने जाणवते.

Answered by rajraaz85
12

Answer:

जल प्रदूषण:

पृथ्वीवर असलेल्या एकूण पाण्यापैकी पिण्यायोग्यशेतीयोग्य किंवा वापरण्याजोगे पाण्याचे प्रमाण खूप कमी आहे.

आपण दैनंदिन जीवनात जे पाणी वापरतो ते पाणी आपल्याला नदी, झरे, तलाव, विहीर, कालवा इत्यादी स्रोतांमधून भेटते.

परंतु सद्यस्थितीत आपल्या निष्काळजीपणामुळे, वाढत जाणाऱ्या लोकसंख्येमुळे किंवा दिवसेंदिवस वाढत असलेल्या औद्योगिकरणामुळे वरीलपैकी स्रोतांमध्ये प्रदूषण वाढताना दिसत आहे.

जलप्रदूषणाची कारणे काहीही किंवा कोणतीही असोत परंतु जल प्रदूषण कमी करणे ही काळाची गरज आहे.

जल प्रदूषण कमी करण्यासाठी काही उपाय योजना:

१. कारखान्यांमधील पाणी शुद्ध करून नदीत सोडणे.

२. गणपती नदीत विसर्जन न करता घरच्या घरी विसर्जन करणे किंवा शाडूच्या गणपती मूर्ती वापरणे.

३. शेतीसाठी वापरण्यात येणारे रासायनिक खते नदीत विहिरीत न टाकणे.

४. प्रत्येकाला पाण्याच्या वापराविषयी जागृत करणे.

Similar questions