जलसंजीवनी जलजागृती निबंध
Answers
Explanation:
देशात आणि राज्यात ग्रंथालय चळवळ अतिशय जुनी आहे. हजारो वर्षांपूर्वीचे ग्रंथ आजही कायम आहेत. या ग्रंथांचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. ग्रंथ पिढी घडविण्याचे, सुसंस्कृत करण्याचे काम करतात. ग्रंथालय चळवळ टिकली नाही तर नव्या पिढील देशाचा इतिहास आणि संस्कृती कळणार नाही. त्यामुळे ग्रंथालय चळवळ टिकली पाहिजे, अशी अपेक्षा राज्याचे कृषी तथा जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज व्यक्त केली.
स्थानिक गर्दे वाचनालयाच्या सभागृहात आज दोन दिवसीय जिल्हा ग्रंथोत्सव 2017 चे उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार होत, तर खासदार प्रतापराव जाधव, जि. प. अध्यक्षा श्रीमती उमाताई तायडे, आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, जि. प. सदस्या श्रीमती ज्योती खेडेकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे, सहायक ग्रंथालय संचालक ज. सु. पाटील, जिल्हा माहिती सहायक निलेश तायडे, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष कि.वा. वाघ, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सतीश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
ग्रामीण भागात ज्ञानेश्वरी, संत तुकाराम महाराजांची गाथा, ग्रामगीतेचे सामूहिक वाचन केले जात असल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, अशा विविध धार्मिक तसेच वैचारीक सामाजिक ग्रंथांचे जतन ग्रंथालय चळवळीने केले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील वाचन चळवळ अधिक बळकट होणे गरजेचे आहे. ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून अशासन स्तरावर ग्रंथालय चळवळ संवर्धनाचे काम केले जात आहे.
यावेळी खा. प्रतापराव जाधव म्हणाले, आयुष्यात पुस्तकांचे महत्व मोठे असून ग्रंथ हे गुरु समान आहेत. ग्रंथ जिवनाला दिशा देण्याचे काम करतात. त्यामुळे ग्रंथालय व वाचन संस्कृती टिकणे महत्वाचे असून त्यासाठी ग्रंथोत्सव अत्यंत महत्वपूर्ण असल्याचेही त्यांनी सांगितले. जि. प. अध्यक्षा श्रीमती उमाताई तायडे यावेळी म्हणाल्या, प्रत्येक गावात ग्रंथालयाची गरज आहे. त्यामुळे गावागावात ग्रंथालय उभारली पाहिजेत.
जिल्हाधिकारी डॉ. पुलकुंडवार म्हणाले, ज्या देशात मोठ - मोठी ग्रंथालये आहे. तो देश समृद्ध समजल्या जातो. सध्या मोबाईल युग आहे. सर्वच बाबी मोबाईलवर पाहिल्या जातात, अगदी पुस्तकही मोबाईलवर वाचली जातात. परंतु प्रत्यक्ष हातात घेऊन पुस्तक वाचनाचा फायदा अधिक होतो. नवीन पिढी पुस्तकांना विसरली तर भविष्यकाळ कठीण राहिल. त्यामुळे वाचन चळवळ वाढविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
सुरुवातीला जिल्हा ग्रंथपाल सतीश जाधव यांनी प्रास्ताविकातून जिल्हा ग्रंथोत्सवाची माहिती व पार्श्वभूमी विषद केली. वाचन संस्कृती व ग्रंथालय चळवळीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी ग्रंथोत्सव आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शंभर वर्षे पूर्ण झालेल्या वाचनालयांना शतायु ग्रंथालय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन प्रा. निशिकांत ढवळे यांनी, तर आभार कि.वा. वाघ यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्हाभरातील वाचनालयांचे प्रतिनिधी, वाचकप्रेमी, साहित्य व कलाप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. विविध पुस्तक प्रदर्शनी विक्रीच्या स्टॉलचेही मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.