जर एका माणसाने ताशी 30 किमी या गतीने प्रवास केला, तर तो त्याच्या मुक्कामी 10 मिनिटे उशिरा पोहोचतो आणि जर त्याने ताशी 42 किमी या गतीने प्रवास केला, तर तो 10 मिनिटे लवकर मुक्कामी पोहोचतो, तर त्याने प्रवास केलेले अंतर किती आहे.
(A) 36 किमी (B) 35 किमी (C) 40 किमी (D) 42 किमी
Answers
Answered by
27
■■ या प्रश्नाचे उत्तर आहे, माणसाने प्रवास केलेले अंतर आहे, ३५ किमी.■■
जेव्हा माणसाची गती ३० किमी आहे,तेव्हा तो त्याच्या मुक्कामी १० मिनिटे उशिरा पोहोचतो.
तर,त्या माणसामध्ये आणि मुक्कामामध्ये अंतर असेल,
अंतर = गती × वेळ.
= ३० × (T +१/६) किमी(१० मिनिटे = १०/६० घंटा= १/६ घंटा)
म्हणून, अंतर = ३० ×( T +१/६ )किमी ...(1)
जेव्हा माणसाची गती 42 किमी आहे,तेव्हा तो त्याच्या मुक्कामी 10 मिनिटे लवकर पोहोचतो.
तर, त्या माणसामध्ये आणि मुक्कामामध्ये अंतर असेल,
अंतर = गती × वेळ.
अंतर = ४२ ×(T -१/६)किमी .....(2)
समीकरण (1) आणि (2) वरून आपल्याला मिळते,
३० ×( T +१/६ )=४२ ×(T -१/६)
३०T + ५= ४२ T - ७
५+ ७= ४२ T -३०T
१२= १२T
म्हणून, T = १
आता, T ची वैल्यू आपण समीकरण (1) मध्ये वापरल्यावर,
३० ×( १ +१/६ )किमी
=३० ×(७/६)
=३५ किमी
Answered by
10
पर्याय क्रमांक B 35 km म्हणजे ३५ किलोमीटर
Similar questions