India Languages, asked by shrimanjarathakar, 8 months ago

*जरासं डोकं चालवा* . . . .
खालील शब्द ओळखा

शब्दात शेवट *"त्र"* असले पाहिजे.

१. सखा➖
२. लक्ष्मणाचे दुसरे नाव➖
३. अग्नी सतत प्रज्वलीत असणे➖
४. सगळीकडे➖
५. पंचगव्यातील एक➖
६. महाभारतातील लढाई झाली ते ठिकाण➖
७. अभ्यासक्रमातील ६ महिन्याचा काळ➖
८. मुलगा➖
९. विद्यार्थी➖
१०. कारस्थान➖
११. केवळ/फक्त ➖
१२. गणितातील नियम➖
१३. डोळे➖
१४. नाटकातील कलाकार➖
१५. श्लोक➖
१६. निशा➖
१७. विज्ञान➖
१८. तारे, ग्रह➖
१९. चालचलन➖
२०. ऐक ऋषी➖
२१. टपाल➖
२२. कापड➖
२३. पूर्वज /ऋषी कडून चालत आलेले कुळ➖
२४. धर्मार्थ अन्न मिळण्याचे ठिकाण➖
२५. हत्यार➖
२६. सख्खे नसलेले➖
२७. विक्षिप्त➖
२८. शुभ/पावन➖
२९. सौभाग्यलेणे➖
३०. हजार➖​

Answers

Answered by adhende115
2

Answer:

1=मित्र,4=सर्वत्र,8=पुत्र,13=नेत्र 21=पत्र

Explanation:

bs itna hi aata he

Answered by banegaonavinash0
0

1) सखा - मित्र

2)लक्ष्मणाचे दुसरे नाव - सुमित्र

3)अग्नी सतत प्रज्वलित असणे - अग्निहोत्र

4)सगळीकडे - सर्वत्र

5)पंचगव्यातील एक - अत्र

6)महाभारतातील लढाई झाली ते ठिकाण - कुरूक्षेत्र

7) अभ्यासक्रमातील ६ महिन्याचा काळ - सत्र

8)मुलगा - पुत्र

9)विद्यार्थी - छात्र

10)कारस्थान - षड् यंत्र

11)केवळ/फक्त - मात्र

12)गणितातील नियम - सूत्र

13) डोळे - नेत्र

14)नाटकातील कलाकार - पात्र

15)श्लोक - स्तोत्र

16) निशा - रात्र

17) विज्ञान - शास्त्र

18)तारे, ग्रह - नक्षत्र

19)चालचलन - चरित्र

20)एक ऋषी - विश्वामित्र

21) टपाल - पत्र

22)कापड - वस्त्र

23)पूर्वज /ऋषी कडून चालत आलेले कुळ - गोत्र

24) धर्मार्थ अन्न मिळण्याचे ठिकाण - अन्नछत्र

25)हत्यार - अस्त्र

26)सख्खे नसलेले - सावत्र

27) विक्षिप्त - विचित्र

28)शुभ/पावन - पवित्र

29)सौभाग्यलेणे - मंगळसूत्र

30) हजार - सहस्त्र

Similar questions