India Languages, asked by amogh1087, 9 months ago

जर सूर्य उगवला नाही तर?​

Answers

Answered by sumeetbhambra
21

सूर्य उगवला नाही तर ... या विषयावर निबंध

17

पृथ्वीवरील जीवनाचा मुख्य स्रोत सूर्य आहे. सूर्याची ऊर्जा कधीही न संपणारी आहे.सूर्यमुळे पृथ्वीवरील दिवस आणि रात्र आहे.. सूर्य पृथ्वीपेक्षा 10 दशलक्ष पटीने मोठा आहे. आणि सूर्य आकाशगंगेतील सर्व ग्रहांना उर्जा आणि उष्णता देततो. पण अचानक सूर्य उगवला नाही तर काय होईल याची तुम्ही कल्पना करू शकता का? आज पाहूया या की जर सूर्य अचानक कुठेतरी हरवला तर त्याचा काय परिणाम होईल ...

गुरुत्वाकर्षण शक्ती

सूर्य उगवल्यानंतर, त्याचा प्रकाश व उर्जा ८मिनिट आणि १९सेकंदात पृथ्वीवर येतो . परंतु तो जर उगवला नाही तर पृथ्वीवर फक्त ८ मिनिटे एकाच सूर्यप्रकाश राहील त्यानंतर, पृथ्वीवर अनंतकाळपर्यंत रात्रीची सुरूवात सुरू होईल. सूर्य न उगवल्याने आपण केवळ सूर्यप्रकाश किवा ऊर्जा नाही तर पृथ्वी गुरुत्वाकर्षण देखील गमावून बसेल. आणि ह्यामुळे पृथ्वी सूर्याच्या कक्षातून बाहेर पडेल. तसेच वर्तुळाकार फिरणारी पृथ्वी सरळ रेषेत 18 मैल वेगाने प्रवास सुरू करेल आणि अवकाशात हरवून जाईल .

प्रकाश संश्लेषणाची कृती

वनस्पती कार्बन डाय ऑक्साईड शोषून आणि पाण्याचा वापर करून अन्न तयार करण्यासाठी सूर्यप्रकाश वापरतात. सूर्याशिवाय, वनस्पती कार्बन डाय ऑक्साईडचा वापर शकत नाहीत आणि ऑक्सिजन सोडू शकत नाहीत. अशा प्रकारे, वनस्पती मध्ये प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया देखील सूर्यप्रकाशाशिवाय थांबविली जाईल.याचे परिणाम खूप वाईट होतील कारण वातावरणात कार्बोन डाय ऑक्साइडचे प्रमाण खूप वादळे जाईल आणि पृथ्वीवरील सर्व गोष्टी भूतकालात जातील.

पृथ्वीवरील तापमान

सूर्याशिवाय, आपल्या पृथ्वीवरील तापमान कमी सुरू होईल आणि संपूर्ण ग्रह गोठून जाईल . संपूर्ण पृथ्वी गोठायला खूप वर्षे लागतील मात्र पृथ्वीच्या वातावरणातील तापमान तब्बल उणे 240 अंश पोहोचेल.

ह्या सगळ्यात साहजिकच आहे की आपली सगळी जीवन जाती नष्ट झाली असेल म्हणूनच सूर्य नेहमी उगवला पाहिजे

Explanation:

. .

Similar questions