जर वर्तमानपत्रे नसते तर काल्पनिक निबंध (मराठी)
Answers
Answer:
वृत्तपत्र बंद झाली तर पहिल्यांदा गैरसोय होईल ती चोखंदळ वाचकांची. आजचं युग हे सोशल मीडिया चं युग आहे , मात्र तरीही अगदी नियमितपणे वृत्तपत्र वाचणारा , विशिष्ट वाचकवर्ग यां वृत्तपत्रांनी तयार केला आहे. सकाळ , लोकसत्ता , लोकमत , नवाकाळ अशा कितीतरी वृत्तपत्र पिढ्यानपिढ्यांपासून वाचली जात आहेत. बरं हिंदी , ईग्रजी आणि इतर वृत्तपत्रांबाबतीही हीच परिस्थिती आहे.
काही लोकांना एकवेळ पहाटे चहा नसेल तरी चालेल , पण आधी वृत्तपत्र वाचायला हवीच!मग त्यांचं तर दिवसचक्रचं कोलमडून जाईल. कित्येक लहानग्या बालकांना ऐन वेळी ' शी' झाली म्हटलं , की त्यांच्या आयांच्या मदतीसाठी सर्वात आधी ' टिश्यू' म्हणुन हा पेपरच धावून येतो ना! उकडत्या गर्मीत हवेचे चार झोक अंगावर घ्यायचे असतील किंवा थंडगार आइसक्रिमचे टपटप गळणारे थेंब अंगावर सांडू नये , म्हणुन त्याला तोलून धरण्यासाठी पेपरच लागतो. गाड्यांवरचे वडापाव-भजीपाव ,भेळ , किंवा तत्सम काही चीजावस्तू पार्सल द्यायच्या म्हटल्या की हा पेपरच तिथं हजर असतो. दिवाळीत तर फराळ बनवताना लाटलेल्या करंज्या , शंकरपाळ्या असोत , किंवा फळीवरचे आच्छादन म्हणुन असो , जिकडेतिकडे वृत्तपत्र सेवेसाठी हजर आहेचं आहे.
बरं हा झाला गमतीचा भाग , आता थोड मागंं इतिहासात डोकावून पाहूया . या देशातील किंवा या जगातील अशी कुठलीच क्रांती नसेल की जिथे वृत्तपत्रांनी आपली बाजू भक्कमपणे मांडली नसेल.
निशस्त्रांचे शस्त्र ते असतं वृत्तपत्र! जिथे हातघाईची भाषा कमी पडते , जिथे स्वातंत्र्याची मुस्कटदाबी केली जाते , मूलभूत- न्याय्य हक्कांची , गळचेपी होते तिथे ही वृत्तपत्र कामी येतात. मग त्यातले शब्दवेधी बाण संपादकीय , हेडलाईन्स च्या माध्यमातून असे काही बरसतात की मग अन्याय करणाऱ्याला पळता भुई थोडी होते. ©अमोलदिघे
आठवा जरा , लोकमान्य टिळक तर ' केसरी ' आणि
'मराठा' च्या माध्यमातून ब्रिटिश सरकारवर अक्षरशः घणाघाती प्रहार चढवत असतं. कित्येक क्रांतिकारक भूमिगत राहून या वृत्तपत्रांतून आपले विचार जनमानसापर्यंत पोहोचवत असतं. आचार्य अत्र्यांनी तर " संयुक्त महाराष्ट्र झालाचं पाहिजे! " असा यल्गारचं आपल्या वृत्तपत्रांतून काढला होता. खरंच त्यावेळची वृत्तपत्र म्हणजे केवल वृत्तपत्रे नव्हती तर राष्ट्रचेतना घडवणारी साधने होती.
बाळशास्त्री जांभेकर यांनी तर आपल्या पहिल्या वहिल्या वृत्तपत्राचे नावचं ठेवले होते , ' दर्पण' .
अर्थात आरसा. समाजमनाचा आरसा. समाजात जें काही बरेवाईट होतं , त्याचे समाजमनावर उमटणारे पडसाद दाखवण्याचे काम वृत्तपत्र करीत असतात.
आणीबाणी काळात तर हिटलर आदी अनेक हुकूमशहा , नेत्यांनी तर सर्वात आधी बंदी कुठल्या गोष्टीवर घातली असेल तर ती म्हणजे वृत्तपत्र! इतके अलौकिक सामर्थ्य त्यात दडलेले आहे.
समाजाला योग्य दिशा देण्याचे काम ही वृत्तपत्र करतात.
वृत्तपत्रामुळे आपल्याला घरबसल्या जग समजते. समजा दिवसभरात एखादी बातमी पहायची वा रेडिओ वर ऐकायची राहून गेली , तर ती हमखास वृत्तपत्रात वाचायला मिळते. वृत्तपत्रांतील निरनिराळे लेख , बातम्या , मथळे यांमधून वाचकाला विविध गोष्टींचे ज्ञान मिळते. हेच मिळवलेले ज्ञान अनेक मुलाखती , प्रश्नमंजुषा , परीक्षेत कामी येते. वृत्तपत्रांतील विविध सदरात जाणकारांचे लेख येतात , ज्यामुळे आपल्या व्यवहारात शहाणपण येते , फसव्या जाहिराती , पैशांची प्रलोभने यांना व्यक्ती सहसा बळी पडत नाही. वृत्तपत्रांतील जाहिरातीतून कित्येक लोकांच्या रोजगाराचा प्रश्न सुटतो , कुणाची लग्ने जुळतात ,कुणी बक्षिसे जिंकतात , काही हरवलेली माणसे सापडतात. वृत्तपत्रांतून येणाऱ्या कथा , गोष्टीं, चित्रे , विनोद यांमुळे आपल्या बालमनाला आनंद मिळतो. नेमक्या परिस्थितीवर भाष्य करणारी व्यंगचित्र आपल्याला नकळत अंतर्मुख ही करतात , नटनट्यांच्या जाहिराती असतात , घरे खरेदी-विक्री , विविध नोटिसा , औषधे -अवजारे च्या जाहिराती , खाण्यापिण्याच्या चीजा वस्तू , लॉटरी चे निकाल , गृहपयोगी वस्तू च्या जाहिराती असतात. सहली , ट्रिप यांमुळे पर्यटनव्यवसायाला चालना मिळते. सरकारची धोरणे , प्रश्न , शासकीय-निमशासकीय सोईसुविधाची माहीती होते. घरापासून ते अगदी देश-विदेशापर्यंत सर्वांची इत्यंभूत माहीती मिळते. काही नाही तर निदान आपल्या भविष्यात काय वाढून ठेवलंय , हे पहायला ' राशिभविष्य' ही असतंच की!
असे एक नां अनेक लाभ वृत्तपत्रांमुळे होतात.शिवाय घरोघरी जावून वृत्तपत्र विकणाऱ्या हातांनाही रोजगार मिळतो. एकटेपणात विरंगुळा म्हणुन वृत्तपत्रांसारखा मित्र नाही.
वृत्तपत्रे म्हणजे प्रगतीचे द्योतक! वृत्तपत्रांमुळे समाजाला चालना मिळते , समाजाला गती मिळते , नवे विचार पुढे येतात , विकास साधता येतो. जो मनुष्यासाठी आवश्यकच आहे. वृत्तपत्रे बंद झाली तर ह्या साऱ्यालाच खीळ बसेल , प्रगती खुंटीत होईल, जे चुकीचं आहे. हवा , पाणी , जमीन यांप्रमाणे वृत्तपत्रेही आता मनुष्याच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहेत. त्यांना वगळणे शक्य नाही. ती असायलाच हवीत!
I hope it's helpful
please mark as brainliest