Hindi, asked by shreya7257, 1 year ago

jay jay he bharat desha appreciate in marathi language​

Attachments:

Answers

Answered by varadad25
106

उत्तर :-

जय जय भारत देशा

१) प्रस्तुत कवितेचे कवी : मंगेश पाडगावकर.

२) कवितेचा रचनाप्रकार : गीत.

३) कवितेचा काव्यसंग्रह : सलाम.

४) कवितेचा विषय : देशप्रेम व एकात्मता.

५) कवितेतून व्यक्त होणारा भाव : देशप्रेम व एकात्मता वाढवण्याचा ध्यास.

६) कवितेच्या कवींची लेखनवैशिष्ट्ये : प्रस्तुत कवितेची रचना गीतप्रकारात केलेली आहे. या कवितेत ध्रुपद व कडवी अशी कवींची लेखनवैशिष्ट्ये आढळतात.

७) कवितेची मध्यवर्ती कल्पना : हे एक देशभक्तीपर गीत आहे. देशप्रेम व एकात्मता या उदात्त गुणांची प्रेरणा या गीतातून मिळते. या गीतात कवींनी सैनिकांचे महत्त्व सांगितले आहे. ही कविता देशाला व सैनिकांना अर्पण आहे.

८) कवितेतून व्यक्त होणारा विचार : प्रस्तुत कवितेत कवींनी देशप्रेमाविषयी उत्कट भावना व्यक्त केली आहे. या कवितेतून देशप्रेम व देश समर्पण हा विचार व्यक्त होतो.

९) कवितेतील आवडलेली ओळ :

तू नव्या जगाची आशा

जय जय भारत देशा

१०) कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे : मला ही कविता खूप आवडली. या कवितेची भाषा सोपी पण प्रभावी आहे. या कवितेत कठीण शब्द नसल्याने कविता लवकर समजते. तसेच 'यमक' अलंकारामुळे कविता ओठांवर रुळते व सतत गुणगुणाविशी वाटते.

११) कवितेतून मिळणारा संदेश : प्रत्येकाने आपल्या देशावर प्रेम करावे. आपल्या देशासाठी व सैनिकांसाठी समर्पण करावे. अशा प्रकारे, देशप्रेम व समर्पणाचा उदात्त संदेश कवितेतून मिळतो.

तुला हे उत्तर मदत करेल अशी आशा करतो.

Similar questions