झाड बोलू लागले तर निबंध
Answers
Answer:
मी पहिल्यांदा मामाच्या गावी गेलो होतो. मामाच्या घराच्या मागेच रान आहे. तिथली झाडेझुडपे पाहून मी हरखून गेलो. एका झाडाखाली अत्यंत आनंदाने निवांत बसलो, तेवढ्यात ते झाड माझ्याशी बोलू लागले.
" बाळा, बघ तुझ्या मनाला आनंद झाला ना ? अरे हेच तर आमची सुख आहे. तुमच्या साठीच आम्ही झटत असतो. तुम्हाला आम्ही सावली देतो, पुढे देतो फळ देतो. आम्ही तुम्हाला लाकूड देतो. आमचे काही बांधव तुम्हाला औषध देतात.
" बाळा तुला ठाऊक आहे का ? आम्ही ढग घडवतो म्हणून तर पाऊस पडतो आमच्यामुळे जमिनीची धूप होत नाही. आमच्यामुळेच नद्यांना व्हेरी तलावांना पाणी मिळते.
" परंतु तुमच्यापैकी काही लोक निष्ठूरपणे जंगलतोड करतात. हे खूप घातक आहे. त्यामुळे सगळे सजीव नष्ट होतील. माणूसही नष्ट होईल. लक्षात ठेवा आम्ही जगलो तर तुम्ही जगाल" एवढे बोलून झाड शांत झाले.
Explanation:
please make me brainlist