झाड जणू पक्ष्यांना जागवण्यासाठी नवं आश्वासक निमंत्रण देतात या विधानावर तुमचे स्वामत लिहा
Pls answer
Will mark you as the brainliest
Answers
Answer:
पक्ष्यांचं जग मोठं रमणीय. आकाशात विहरणारं स्वच्छंद आयुष्य. मात्र, अशा आयुष्यालाही विसावणारं घरकूल हवं असतं. पक्ष्यांची घरटी हा कलाकुसरीचा अत्यंत सुंदर नमूना असतो. काडी काडी जमवून पक्षी स्वतः ही कलाकुसर करून उन-पावसापासून रक्षण करणारं घरटं बांधतात; पण अलीकडे कृत्रिम घरटी करण्याचा एक नवाच प्रकार पाहायला मिळतो.
१९७० च्या सुमारास सुबाभूळ ही ब्राझिलमधून आयात केलेली वनस्पती लावायची लाट आली होती, तशी सध्या पक्ष्यांना वाचवण्याचं एक प्रतीक म्हणून पक्ष्यांसाठी कृत्रिम घरटी तयार करून ती झाडांवर, घरांवर, खांबांवर, कुंपणांवर लावायची एक लाट आली आहे. पक्ष्यांसाठी घरटी लावणं म्हणजे एनव्हॉयर्नमेंटवर टिक झाली, असा समज करून घेऊन केवळ व्यक्ती आणि संस्थांच नाहीत, तर राजकीय पक्षांनीही हा उपक्रम राबवायला सुरुवात केली आहे. जुनी, मोठी झाडं असलेल्या परिसरात आणि त्या झाडांना ढोल्या, भोकं, फटी आहेत अशा ठिकाणी घरटी लावली जात आहेत. खरं तर जिथे भरपूर झाडं आहेत तिथे घरटी लावण्याची आवश्यकता नाही. या उपक्रमातील सगळ्यात मोठी गोची म्हणजे घरटी लावण्याच्या आधी तिथे घरट्यांचा वापर करण्याची शक्यता असलेल्या पक्ष्यांच्या जाती अस्तित्वात आहेत की नाहीत, इतकी साधी गोष्टही पहिली जात नाही. घरटी कोणत्या दिवशी लावली, कुणी लावली, कोणत्या झाडांवर लावली, जमिनीपासून किती उंचीवर लावली, वाऱ्या-पावसाची दिशा बघून लावली की नाही, एकाच प्रकारची लावली की वेगवेगळ्या जातींच्या पक्ष्यांचे आकार आणि त्यांच्या गरजा ओळखून त्याप्रमाणे वेगवेगळ्या आकारांची आणि प्रकारांची लावली (उदा. पिंगळा नामक घुबडाला आकर्षित करण्यासाठी लावलेलं कृत्रिम घरटं राखी वल्गुली या चिमणींपेक्षा लहान आकाराच्या पक्ष्याला कोणत्याही परिस्थितीत उपयुक्त ठरणार नाही), किती घरट्यांचा पक्ष्यांनी प्रत्यक्ष उपयोग केला, काही महिने उलटल्यानंतर घरट्यांची अवस्था कशी आहे, या महत्त्वाच्या मुद्द्यांचा विचार न करता किती घरटी लावली, यावर प्रामुख्यानं भर दिला जातो. घरटी लावण्याच्या वेळेचा अभूतपूर्व उत्साह म्हणता म्हणता मावळत जातो. देखभाल आणि पाठपुराव्याच्या नावानं आनंदच असतो.
या लाटेत चान्यांचा (पाच पट्टेवाल्या - Five-Striped Plam Squirred आणि तीन पट्टेवाल्या खारी - Three-striped Plam Squirrel) मात्र, फायदा होतोय. त्यांना पिल्लं घालण्यासाठी या घरकुलांच्या रूपानं भरपूर जागा उपलब्ध होत आहेत. माझी अशी खात्री आहे, की हळूहळू खारींची संख्या वाढणार आहे. त्या प्रसंगी आक्रमक होऊन घरकुलाचा ताबा घेतलेल्या एखाद्या जंगली मैनेला हाकलून तिची जागा घेत आहेत. याच खारी पक्ष्यांची अंडीपिल्ली साफ करून त्यांच्या मुळावर येऊ शकतात. त्यामुळे पक्ष्यांसाठी घरटी लावल्यामुळे खारींची संख्या वाढणार आहे. काही प्रमाणात हे या आधीच सुरू झालेलं आहे.
पुणे महानगरपालिकेच्या वॉर्डस्तरीय वृक्षगणना अहवालानुसार २५० चौरस किलोमीटर क्षेत्रात सुमारे ३८ लाख वृक्ष आहेत. (यात वनखात्याच्या अखत्यारीतील वृक्षांची गणनादेखील समाविष्ट करण्यात आली आहे.) पुण्यात एकूण सुमारे २००० पेक्षा जास्त वनस्पतींच्या जाती (तृणवर्गीय प्रजाती धरून) असाव्यात. अशा परिस्थितीत एका पुणेकरानं एक झाड दत्तक घेऊन वाचवलं तरी मोठं काम होईल. कृत्रिम घरटी लावण्यापेक्षा आहे त्या वृक्षसंपदेचं जतन आणि संवर्धन करणं याला प्राधान्य दिलं पाहिजे.
एका बाजूला आधी उगवलेली झाडं छाटून किंवा तोडून एकही कोनाडा किंवा वळचण नसलेल्या चकचकीत अत्याधुनिक इमारती उभारायच्या, तथाकथित स्वच्छतेच्या नावाखाली पेव्हिंग ब्लॉक्स टाकून जमिनी गुदमरवून टाकायच्या, नदीपात्रात राडारोडा टाकून छोटे छोटे; पण अत्यंत महत्त्वाचे अधिवास नष्ट करायचे, भराव टाकून जिवंत झरे बुजवायचे, काचा लावलेली घरं बांधायची, मोठमोठ्या निवासी संकुलांमध्ये पायाला मातीसुद्धा लागू नये म्हणून फरसबंदी करायची, छोट्या छोट्या अंतरासाठी सायकल चालवणं किंवा पायी जाणं शक्य असूनदेखील गाड्या पिदडायच्या, साधी केळी किंवा भाजी आणतानासुद्धा अरेरावी करून प्लास्टिकची कॅरीबॅग हक्कानं मागून घ्यायची, केवळ आपल्यामुळे निसर्गाचा ऱ्हास होतोय हे प्रत्यक्ष दिसत असूनदेखील त्याच जुनाट पद्धतीनं सणवार साजरे करायचे (वर्षभर फटाके उडवायचे, गुढीपाडव्याला कडुनिंबाच्या, दसऱ्याला आपट्याच्या आणि कांचनाच्या झाडांच्या फांद्या तोडायच्या, नदीत प्लास्टिकच्या पिशवीसह निर्माल्य आणि घरातला सर्व प्रकारचा कचरा टाकायचा), झाडांची संख्या हा मुद्दा गृहित धरला, तर पुण्यासारख्या शहरात ९० टक्के वृक्ष (सुमारे २४०जाती) परदेशी असूनसुद्धा पुन्हा परदेशी झाडं लावायची आणि दुसऱ्या बाजूला चिमण्यांचा पुळका आणून कृत्रिम घरट्यांचा घाट घालायचा असा प्रकार सुरू आहे. हा शुद्ध वेडेपणा आहे. एका बाजूला निसर्गाच्या विरुद्ध वागायचं आणि दुसऱ्या बाजूला पक्ष्यांसाठी घरटी लावायची म्हणजे पाणी नसलेल्या विहिरीत पोहरा सोडण्यासारखं आहे. शहरातल्या छोट्या छोट्या अधिवासांची गुणवत्ता आणि सलगता अत्यंत महत्त्वाची आहे. ही गुणवत्ता अव्वल दर्जाची असेल तरच पक्ष्यांना पुरेसे अन्न उपलब्ध होईल आणि वीण घालण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होईल. मगच निसर्गत: झाडांच्या ढोल्यांमध्ये किंवा भोकांमध्ये घरटी करणारे पक्षी अशा जागा उपलब्ध नसतील तर कृत्रिम घरकुलांचा वापर करण्याची निदान शक्यता तरी निर्माण होईल.