झाडे लावा झाडे जगवा निबंध
Answers
Answered by
4
झाडे लावा झाडे जगवा...
वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे ।
पक्षी ही सुस्वरे आळविती ॥१॥
येणे सुखे रुचे एकांताचा वास ।
नाही गुण दोष अंगा येत ॥ध्रु.
खरेच निसर्गाचा अविभाज्य भाग म्हणजे झाडे. ही झाडे आपले सगेसोयरेच असतात, कारण झाडांमुळे खूप काही फायदे या सजीवसृष्टीला मिळतात. त्यामुळे आपण सर्वानी एकजुटीने राहून झाडांचे संरक्षण केले पाहिजे. मनुष्याला जीवन जगण्यासाठी झाड अतिशय महत्वपूर्ण साधन आहेत. मनुष्यच प्रत्येक सजीवाला जीवन जगण्यासाठी वृक्ष खूप महत्वाची भूमिका पार पडतात. जसे आपले सगेसोयरे, नातेवाईक, मित्र आपल्याला निरनिराळ्या संकटातून वाचवत असतात तसेच हि झाडे सुद्धा आपले नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण करतात. एका तर्हेने ते आपले पालनपोषण करतात असे म्हणावयासही हरकत नाही. म्हणून आपल्यालाही त्यांच्या संरक्षणासाठी तेवढाच जागरूक आहे.
प्राचीन काळापासून वृक्ष मानवाच्या उपयोगी पडत आहेत. पूर्वी माणूस जंगलातच राहत असे त्यामुळे जंगलातूनच मानवाच्या अनेक गरज भागात असत. वृक्ष हे मानवाला फळ, फुल, भोजन, औषधी वनस्पती, इंधन प्राप्त करून देतात. पूर्वी माणसाला घालायला कपडे नसत तर माणूस झाडाच्या फांद्यांचे कपडे बनवून स्वतःचे संरक्षण करत असत. पूर्वी माणूस कंदमुळे खात असे ती झाडांपासूनच मिळालेली असत. हिंस्त्र प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी मानव जंगलात वानवा पेटवत असे त्यामध्ये तो झाडाचाच वापर करत होता. त्यानंतर हत्याराचा शोध लागला. ती हत्यारे काही प्रमाणात झाडाच्या लाकडापासूनच बनवली जात असत. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे झाडे पूर्वीपासूनच आपल्याला शुद्ध हवा प्रदान करत आहेत आणि स्वतः हानिकारक असलेला कार्बनडीऑक्सिड शोषून घेतात.
Similar questions
Accountancy,
1 day ago
World Languages,
2 days ago
Biology,
8 months ago
Environmental Sciences,
8 months ago