झाडे नसती तर मराठी निबंध
Answers
झाडं नसती तर
झाडं आपल्याला श्वास घ्यायला शुद्ध हवा देतात. खायला फळ देतात. शृंगाराला फुलं देतात. जाळायला लाकूड देतात. झाडं काहीही अपेक्षा न करता आपल्याला सावली देतात.
झाड नसती तर आपल्याला शुद्ध हवा, फळ, फुल, लाकूड ,सावली, यातलं काहीही मिळालं नसत. झाडांशीवाय जमिनी ओसाड दिसल्य असत्या. माती पाण्यासोबत वाहून गेली असती. झाड नैसर्गिक संतुलन बनवून ठेवतात.
झाडं खूप महत्वाचे आहेत.
■■ झाडे नसती तर!■■
झाडांचे बरेच फायदे आहेत. झाडाचा प्रत्येक भाग कशा न कशा प्रकारे तरी उपयोगी ठरतो. झाडे बहुउपयोगी असून, ती आपल्यासाठी, पर्यावरणासाठी आणि प्रत्येक जीवासाठी खूप महत्वपूर्ण ठरतात.
अशा वेळी, झाडे नसती तर, आपल्याला खूप साऱ्या समस्यांना सामोरे जावे लागेल.झाडे नसती तर, आपल्याला श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन कुठून मिळेल? झाडे नसती तर, आपल्याला व जनावरांना खाण्यासाठी फळे,फुले, भाज्या मिळाल्या नसत्या. आपल्याला कडक उन्हात सावली, पक्ष्यांना व जनावरांना आश्रय मिळाले नसते.
झाडे नसती तर, आपल्याला विविध कामांसाठी उपयोगी असलेले लाकूड मिळाले नसते. झाडे नसल्यावर आपल्या पृथ्वीवरचे तापमान वाढल्या असते, पावसाचे प्रमाण कमी झाल्या असते. निसर्गाचे संतुलन बिघडल्या असते. पर्यावरणातील हिरवळ गायब झाल्या असती.
म्हणून, झाडे नसती तर, हा विचारच आपण करू नये!