India Languages, asked by rutujapsawant9, 11 months ago

कोडी- ओळखा पाहू मी कोण?

१. पुरूष असून पर्स वापरतो
वेडा नसून कागद फाडतो
असा माणूस कोण ?

२. पाणी नाही, पाऊस नाही, तरी रान कसं हिरवं
कात नाहि, चुना नाही, तरी तोंड कसं रंगल?

३. बत्तीस चिर्‍यांमधे नागिण फिरे

४. खण खण कुदळी, मण मण माती
इंग्रजांनी राज्य घेतले मध्यराती

५. हरीण पळतंय, दूध गळतयं

६. एव्हढिशी नार, तिचा पदर फार

७. सुपभर लाह्या, त्यामध्ये रुपया

८. चार आले पाहुणे, चार केले घावणे
प्रत्येकाच्या तोंडात दोन दोन

९. इतकासा गडू पाहुन येते रडू

१०.लाल पालखी हिरवा दांडा

११.कोकणातनं आला भट
धर की आपट

१२.हिरवी पेटी काट्यात पडली
उघडून पाहिली तर मोत्याने भरली

१३.सगळे गेले रानात
अन् झिपरी पोरगी घरात

१४.काळ्या रानात हत्ती मेला त्याचा प्रुष्टभाग ऊपसून नेला.

१५. आकाशातून पडली घार
तिला मारून केलं ठार
रक्त प्यायलं घटाघटा
मांस खाल्लं मटामटा

१६.घम घम घमाटा
विषाचा काटा
सोन्याच्या देवळात
रुप्याच्या घंटा

१७.घाटावरनं आल्या बाया
त्यांच्या सुरकुतल्या काया

१८.तीनजण वाढायला बाराजण जेवायला

१९.लाल आहे पण रंग नाही, कृष्ण आहे पण देव नाही, आड आहे पण पाणी नाही, वाणी आहे पण दुकान नाही.

२०.घड्याळातला असा कोणता काटा आहे जिथे दोन्ही काटे आले कि तितकेच वाजायला तितकेच कमी असतात..?​

Answers

Answered by diya9019
1

If you want to answer of this question in hindi or English so translate this question in hindi or English

Similar questions