कोण ते लिहा : (१) परमेश्वर कृपेची याचना करणारे __________. (२) सेवांची विनवणी करणारा __________. (३) भुकेलेल __________. (४) भारताच्या हाकेला धावून येणारा -___________. this subject is Marathi plz help me plz.
Answers
Answer:
१. नामदेव महाराज
२. सेवक
३. गाईचं वासरू
४. परमेश्वर
Explanation:
प्रस्तुत प्रश्न हा "अंकिला मी दास तुझा" या पद्यतील असून या अभंगात संत नामदेवांनी हरिणी-तिचे पाडस, चातक-मेघ अशा विविध उदाहरणांतून परमेश्वर भेटीची तीव्र ओढ व्यक्त केली आहे.
बनात वणवा पेटताच हरिणी आपल्या पाडसाच्या चिंतेने व्याकुळ होते. ज्याप्रमाणे पावसाची वाट पाहणारा चातक पक्षी ढगाला पाऊस पाडण्यासाठी विनवणी करतो, त्याचप्रमाणे हे बिठ्ठला, तुझ्या कृपेची माझ्यावर बरसात व्हावी, म्हणून मी तुझी आळवणी करत आहे, असा अर्थ कबी यातून व्यक्त करतो.
हरिणी, चातक यांच्या उदाहरणांद्वारे कवी ची परमेश्वर भेटीची तीव्रता, कळकळ व्यक्त होते. भक्ती, प्रेम, विरह, व्याकुळता अशा सर्व भावभावना उत्कटपणे येथे व्यक्त झाल्या आहेत. आपले पाडस संकटात असताना हरिणी कोणताही मागचा-पुढचा विचार न करता, जीवाची पर्वा न करता संकटात उडी घेते त्याचप्रमाणे माझी विठुमाऊलीही माझ्यासाठी धावत येईल, असा कवी ला वाटणारा विश्वास यात दिसून येतो.
Answer:
१ नामदेव महाराज. २ सेवक. ३गाईचे वासरु. ४ परमेश्वर