कोणतेही चार वाक्याचे प्रकार उदाहरणासहत (प्रसेक प्रकाराचे दोन उदाहरणे आवस्यक)
Answers
Answered by
9
Answer:
१) विधानार्थी वाक्य - ज्या वाक्यात केवल विधान केले जाते त्याला " विधानार्थी " वाक्य म्हणतात.
उदा. १) मी रोज अभ्यास करते.
२) राम खेळत आहे.
२) प्रश्नार्थी वाक्य - ज्या वाक्यात प्रश्न विचारला जातो त्या वाक्याला "प्रश्नार्थी " वाक्य म्हणतात.
उदा. १) तुम्ही कोण आहात ?
२) तुमचं नाव काय आहे ?
३)आज्ञार्थी वाक्य - ज्या वाक्यात आज्ञा, आदेश, विनंती केली जाते त्या वाक्याला "आज्ञार्थी" वाक्य म्हणतात.
उदा. १) कृपया झाडे तोडू नका.
२) दरवाजा बंद कर.
४)उद्गारार्थी वाक्य - ज्या वाक्यात भावनेचा उद्गार केला जातो , त्या वाक्याला "उद्गारार्थी" वाक्य म्हणतात.
उदा. १) अरेरे ! बिचारा खूप गरीब आहे.
२) शाब्बास ! तुझं उत्तर बरोबर आहे.
Explanation:
Hope it's helpful .
Plzzzz mark as brainlist and follow me.
Similar questions