India Languages, asked by toni7540, 9 days ago

• कोणत्याही एका ऋतूत होणारे बदल तुमच्या शब्दांत लिहा.​

Answers

Answered by MathCracker
13

प्रश्न :-

कोणत्याही एका ऋतूत होणारे बदल तुमच्या शब्दांत लिहा.

उत्तर :-

  • वसंत ऋतु आल्यामुळे सृष्टीत होणारे बदल

नवनिर्मितीची चाहुल देणारा हा वसंत ऋतू सर्व ऋतुंचा राजा मानला जातो. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर वसंताचे आगमन होते आणि सारी सृष्टीच बहरून जाते. थंडी हळूहळू कमी होत जाते. आंब्याला मोहोर येतो त्याचा सुगंध सर्वत्र दरवळतो. सकाळी जाग येते ती कोकिळेच्या मंजुळ स्वरांनी. तिचे ते गायन मनाला आनंद देउन जाते. झाडे पोपटी, हिरव्या लुसलुशीत पानांनी सजतात, थंडगार उसाचा रस प्यायला मजा येते. कलिंगडांचे ढीग बाजारात येउन लागतात. द्राक्षांच्या घडांनी बाजारपेठ फुलते. याच काळात गुडीपाडवा, रामनवमी सणही येतात. शाळेत परीक्षांचे वातावरण असते. बाहेर प्रसन्न वातावरण असल्यामुळे अभ्यास ही छान होतो.  \:

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

Similar questions