कोणत्याही तीन देशाचे राजमुद्रेविषयी माहिती लिहा
Answers
Answer:
राजमुद्रा : एखाद्या दस्तऐवजाचा अधिकृतपणा दर्शविणारे राजचिन्ह. एखादा हुकूम, आज्ञा, दान, अग्रहार या अधिकृत दस्तऐवजांवर राजमुद्रा करण्यात येई. ही प्रथा भारताच्या विविध भागांत प्रचलित होती. निरनिराळ्या प्रदेशांत केल्या गेलेल्या उत्खननांत आणि समन्वेषणात विविध प्रकारच्या मुद्रा सापडलेल्या आहेत. मात्र या सर्व राजमुद्रा म्हणजे राजाने अधिकाऱ्यामार्फत वापरात आणल्या अथवा प्राचीन भारतात केवळ निरनिराळ्या राजांच्याच मुद्रा मिळालेल्या आहेत, असे समजणे बरोबर ठरणार नाही. राज्य करणाऱ्या राजाव्यतिरिक्त इतर अनेक अधिकाऱ्यांच्या, व्यक्तींच्या, गणराज्यांच्या मुद्रा मोठ्या संख्येने उपलब्ध झालेल्या आहेत. ज्यावर मुद्रांचा आशय कोरलेला असतो, त्यांना ठसा अशी संज्ञा देणे योग्य ठरेल. या ठशाचा वापर करून जो आशय वा अक्षरे उठावात उमटविली जातात, त्याला मुद्रा असे नाव देणे बरोबर ठरते. इंग्रजीत यांना अनुक्रमे ‘सील’ आणि ‘सीलिगं’ अशा संज्ञा आहेत.
ताम्रपटांचे पत्रे एका तांब्याच्या कडीत अडकवून त्या कडीच्या एका टोकावर उठावाने काढलेल्या राजमुद्राही अनेक आढळतात. गुप्त, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट इ. घराण्यांच्या तसेच हर्षवर्धनांच्या ताम्रपटांच्या कड्यांवर अशा मुद्रा असून ते ताम्रपट ‘अधिकृत’ केल्याचा तो पुरावा होय. राजे, राण्या, युवराज, राजपुत्र, कुमारामात्य, अधिकारी, प्रादेशिक कारभारविषयक घटक, शैक्षणिक संस्था, मंदिरे, विहार, पंथोपपंथ आणि निरनिराळ्या सामाजिक स्तरांवरील व्यक्ती या सर्वांबद्दल उपयुक्त आणि नवीन माहिती मिळण्याच्या दृष्टीने मुद्रांचा अभ्यास अत्यंत उपयुक्त ठरलेला आहे. मालव जनपद अथवा मालव गण असा उल्लेख असलेल्या मुद्रा पंजाब व राजस्थानात-इ.स.पू. सु. दुसरे शतक या कालखंडात समाविष्ट होणाऱ्या-सापडल्या आहेत, तर पंजाबात यौधेय गण असा निर्देश असलेल्या मुद्रा उपलब्ध झालेल्या आहेत. यांव्यतिरिक्त इतिहासात व वाङ्मयात फारशा प्रख्यात नसलेल्या राजांच्या मुद्राही सापडल्या आहेत. यांची उदाहरणे वैशाली (बिहार) येथे सापडलेली राजा अग्निमित्र याची मुद्रा, राजघाट(उत्तरप्रदेश) येथे उपलब्ध झालेल्या ज्येष्ठमित्र, अश्वघोष, अभय, धनदेव इत्यांदीच्या मुद्रा इ.स.पू.सु. दुसरे शतक ते इ.स. चौथे शतक या कालखंडातील कौशाम्बी, विदिशा, अयोध्या, भीटा, बसार या परिसरात छोटी छोटी राज्ये असणाऱ्या अनेक राजांच्या मुद्रा, यांद्वारे देता येतात. पंजाबात संघोल येथे इ.स. पहिल्या शतकातील खरोष्ठी लिपीत ‘रजदिरजस त्रतरस गुडुफरस’ (गोण्डोफरीस) असा लेख असलेली मुद्रा उपलब्ध झाली आहे. या मुद्रेच्या मध्यभागी उजव्या हातात ढाल आणि डाव्या हातात वज्र घेतलेल्या ‘पल्लास’ या देवतेची मूर्ती आहे.
कनिष्क, पश्चिम क्षत्रपांचे रुद्रसेनादी राजांच्या इसवी सनाच्या सुरुवातीच्या काळातील राजघराण्यांच्या मुद्रा प्रख्यात आहेत. पुणे येथे सापडलेल्या वाकाटक राजघराण्यात लग्न झालेल्या प्रभावती-गुप्ता या राणीच्या ताम्रपटाची मुद्रा चार ओळींची असून ‘बाकाटक ललामस्य क्रप्राप्तनृपश्चियः जनन्या युवराजस्य शासनं रिपुशासनम्’ असा मजकूर त्यावर आहे. वाकाटक घराण्यातील दुसरा प्रवरसेन याचे अनेक ताम्रपट विदर्भात सापडलेले आहेत आणि त्यांवरही राजाचे व वंशाचे नाव दिलेले आहे. गुप्त घराण्यातील श्रीगुप्त, समुद्रगुप्त, घटोत्कचगुप्त, बुधगुप्त इ. राजांच्या मुद्रा उपलब्ध असून त्या या राजांच्या पदव्या, त्यांचा धर्म याची माहिती देतात. त्यांवरील गरुडादी आशय अत्यंत कलात्मक आहेत. हीच प्रथा गुप्तोत्तर काळात चालू राहिली. चालुक्य, राष्ट्रकूट इ. दक्षिणेतील राजघराण्यांच्या ताम्रपटांच्या कड्यांवर राजाचे नाव, पदव्या, राजचिन्ह इ. आशय आढळतात. मध्ययुगात राजमुद्रांची प्रथा चालूच राहिली. सनदा, सरकारी पत्रे वगैरेंवर राजमुद्रा अथवा प्रथम श्रेणी अधिकाऱ्यांच्या मुद्रा उमटविल्या जात. ही प्रथा अगदी शिवकाल आणि त्यांनतरही चालू राहिली. मोडी सनद आणि पत्रे याचा शेवट सर्वसामान्यपणे ‘इति लेखनसीमा’ या शब्दांनी केला जाई व नंतर राजुद्रा उमटविली जाई. ‘प्रतिपच्चन्द्ररेखैव... मुद्रा भद्राय राजते’, ही शिवछत्रपतींची मुद्रा प्रसिद्ध आहे.