Biology, asked by vishvakhengare, 4 months ago

कोणत्या महिन्यात दिनमान साधारणपणे १२
तासांचे होते?
असे घडण्यामागचे कारण काय असावे ?​

Answers

Answered by gunjaupadhyay786
7

Answer:

21 जूनच्या दिवशी पृथ्वी सूर्यासमोर कक्षेत अशा विशिष्ट ठिकाणी येते ज्यामुळे यादिवशी सर्वाधिक सूर्यप्रकाश पृथ्वीवर पडतो. जगातल्या अनेक देशांमध्ये या दिवशी दिवस 12 तासांपेक्षाही मोठा

Explanation

खगोलशास्त्राशी निगडित घडणाऱ्या विविध बाबी खगोलप्रेमींबरोबरच सामान्य माणसांनाही आपल्याकडे आकर्षित करीत असतात. दिवस मोठा, रात्र लहान किंवा रात्र मोठी दिवस लहान, दक्षिणायन, उत्तरायण, सुपरमून यांचे दर्शन, अशा काही ठराविक दिवशी घडणाऱ्या दिवसांचे, घटनांचे विशेष अप्रूप सामान्यांना असते. आजचा (२१ मार्च) दिवसही विशेष असून, हा दिवस आणि रात्र आज समान असणार आहे. बारा तासांचा दिवस व बारा तासांची रात्र आज अनुभवण्यास मिळणार आहे. गुगलनेही डुडलद्वारे या दिनाची माहिती नेटीझन्सला बुधवारी दिली.

सूर्य २१ मार्च व २२ किंवा २३ सप्टेंबर या दिवशी खगोलीय विषुववृत्तावर असतो. त्यामुळे पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणी बारा तासांचा दिवस व बारा तासांची रात्र असते. म्हणून या दिवसांना विषुव दिन असे म्हणले जाते. या दिवशी सर्वत्र सूर्योदय व सूर्यास्त अनुक्रमे सकाळी व संध्याकाळी सहा वाजता होतो, असे सामान्यत: मानले जाते. हे दिवस वगळता दिवस व रात्र नेहमी लहान मोठे असतात. दिवस रात्रीची ही असमानता पृथ्वीच्या आसाच्या कलन्यामुळे निर्माण होते. जो गोलार्ध सूर्याकडे कलतो, त्या गोलार्धात दिवस बारा तासापेक्षा मोठा रात्र बारा तासांपेक्षा लहान असते. ज्यावेळी कोणताही गोलार्ध सूर्याकडे कललेला नसतो तेव्हा पृथ्वीवर दिवस-रात्र समान असते. म्हणजे बरोबर १२-१२ तासांचे असतात, असे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

Similar questions