Geography, asked by PragyaTbia, 1 year ago

कोणत्या देशात वनस्पतींची विविधता अधिक आढळते? त्यामागचे कारण काय असेल?

Answers

Answered by fistshelter
4

Answer: ब्राझील या देशात वनस्पतींची विविधता अधिक प्रमाणात आढळते.

ब्राझीलमधील अमेझॉनचं जंगल हे मुख्यतः घनदाट पर्जन्यवनांचं असून अमेझॉन नदीच्या बाजूने विस्तारलं आहे. पर्जन्यवनांचं वैशिष्ट्य म्हणजे तेथे वर्षभर पाऊस पडत असतो. ब्राझीलच्या उत्तर भागातून विषुववृत्त जाते. त्यामुळे तेथे भरपूर सूर्यप्रकाश असतो आणि सतत पाऊस पडतो. यांमुळे येथील झाडे झपाट्याने वाढतात. घनदाट जंगल आणि भरपूर जैवविविधता यांमुळे येथे मानवी हस्तक्षेप कमी प्रमाणात होतो त्यामुळे वृक्षवाढीस अडथळा येत नाही.

Explanation:

Similar questions