कोणत्या व्यवसायाला खाणकाम म्हणतात?
hey write in 1 sentence
Answers
खाणकाम : मानवी जीवनास अन्न, वस्त्र व निवारा तसेच सुखसोयीच्या वस्तू आणि प्रवास व वाहतुकीची साधने यांची नेहमी आवश्यकता असते. या गोष्टी प्राप्त करून घेण्यासाठी शेती व खाणकाम यांच्यापासून मिळविलेले पदार्थ वापरावे लागतात. या दोन मूलोद्योगांच्या जोरावरच अभिनव संस्कृतीची प्रगती झपाट्याने होत गेली आहे. पैकी शेती करण्यासाठी देखील जी अवजारे, यंत्रे, खते इ. लागतात ती तयार करण्यासाठी खाणकाम करून मिळविलेली खनिजे, धातुके (कच्च्या धातू), खडक, माती इत्यादींवर अवलंबून राहवे लागते. शेतीपासून मानवाला अन्न आणि काही प्रमाणात वस्त्र व निवारा तयार करण्यासाठी लागणारे पदार्थ मिळतात, तर खाणकामापासून पुढील पदार्थ मिळतात :
(१) दगड, वाळू, मृत्तिका आणि सिमेंट बनविण्यास लागणारे पदार्थ वगैरे बांधकामास उपयोगी पडणारे पदार्थ
(२) नैसर्गिक वायू (खनिज इंधन वायू), दगडी कोळसा, खनिज तेल, किरणोत्सर्गी (कण वा किरण बाहेर टाकणारे) पदार्थ ही इंधने
(३) गार्नेट, कुरुविंद (कोरंडम) यांसारखे अपघर्षक (घासून वा खरवडून पृष्ठ गुळगुळीत करण्यासाठी वापरले जाणारे पदार्थ)
(४) हिरा, माणिक, पाचू, पुष्कराज यांसारखी रत्ने
(५) पोटॅश, फॉस्फेटे, नायट्रेटे यांसारखे खते बनविण्यास उपयोगी पदार्थ
(६) गंधक, ग्रॅफाइट, टाकणखार, अभ्रक ॲस्बेस्टस यांसारखे औद्योगिक पदार्थ
(७) सोने, चांदी, तांबे, जस्त, शिसे, लोह, ॲल्युमिनियम
are you Maharashtrian?
Answer:
खाणकाम : मानवी जीवनास अन्न, वस्त्र व निवारा तसेच सुखसोयीच्या वस्तू आणि प्रवास व वाहतुकीची साधने यांची नेहमी आवश्यकता असते. या गोष्टी प्राप्त करून घेण्यासाठी शेती व खाणकाम यांच्यापासून मिळविलेले पदार्थ वापरावे लागतात. या दोन मूलोद्योगांच्या जोरावरच अभिनव संस्कृतीची प्रगती झपाट्याने होत गेली आहे. पैकी शेती करण्यासाठी देखील जी अवजारे, यंत्रे, खते इ. लागतात ती तयार करण्यासाठी खाणकाम करून मिळविलेली खनिजे, धातुके (कच्च्या धातू), खडक, माती इत्यादींवर अवलंबून राहवे लागते. शेतीपासून मानवाला अन्न आणि काही प्रमाणात वस्त्र व निवारा तयार करण्यासाठी लागणारे पदार्थ मिळतात, तर खाणकामापासून पुढील पदार्थ मिळतात : (१) दगड, वाळू, मृत्तिका आणि सिमेंट बनविण्यास लागणारे पदार्थ वगैरे बांधकामास उपयोगी पडणारे पदार्थ (२) नैसर्गिक वायू (खनिज इंधन वायू), दगडी कोळसा, खनिज तेल, किरणोत्सर्गी (कण वा किरण बाहेर टाकणारे) पदार्थ ही इंधने (३) गार्नेट, कुरुविंद (कोरंडम) यांसारखे अपघर्षक (घासून वा खरवडून पृष्ठ गुळगुळीत करण्यासाठी वापरले जाणारे पदार्थ) (४) हिरा, माणिक, पाचू, पुष्कराज यांसारखी रत्ने (५) पोटॅश, फॉस्फेटे, नायट्रेटे यांसारखे खते बनविण्यास उपयोगी पदार्थ (६) गंधक, ग्रॅफाइट, टाकणखार, अभ्रक ॲस्बेस्टस यांसारखे औद्योगिक पदार्थ (७) सोने, चांदी, तांबे, जस्त, शिसे, लोह, ॲल्युमिनियम इ. धातूंची धातुके वगैरे. या निरनिराळ्या पदार्थांपासून युद्धाच्या व शांततेच्या काळी अतिशय महत्त्वाच्या व गरजेच्या वस्तू, अस्त्रे, वाहने वगैरे बनविली जातात.