World Languages, asked by gajanan23, 1 year ago

क्रीडांगणाचे आत्मकथन​

Answers

Answered by sayalibk
3

Answer:

I think you will get your ans on Google

Answered by ItsShree44
4

Answer:

हे पाहा मुलांनो! अरे, इकडेतिकडे पाहू नका. बावरू नका. तुम्ही जिथं उभे आहात ते मैदानच मी तुमच्याशी बोलत आहे. तुम्ही खेळण्यासाठी मित्रांची वाट पाहत आहात ना? म्हटलं, तेवढ्यात तुमच्याशी थोड्या गप्पा माराव्यात. म्हणून तुम्हांला हाक मारली!

अरे मुलांनो, तुम्ही माझ्याजवळ आलात की मी खुशीत असतो. तुमच्यासारखी खूप मुलं यावीत असंच मला वाटत असतं. मुलं असतील तर खरं चैतन्य संचारतं येथे. माझा जन्म झाला तेव्हापासून आजपर्यंत शेकडो, नव्हे हजारो मुलं इथून खेळून गेली आहेत. तुम्हांला ठाऊक नसेल कदाचित वाडेकर, गावस्कर, वेंगसरकर, तेंडुलकर वगैरे खेळाडू नावाजलेले नव्हते, तुमच्यासारखेच साधे विद्यार्थी होते, तेव्हा ते येथे, माझ्या अंगाखांदयावर खेळले आहेत. मला त्यांचा खूप अभिमान वाटतो. कधीही त्यांची नावं ऐकली की ऊर भरून येतो!

मुलांनो, इथे माझा जन्म झाला तोच मुळी तुमच्यासाठी. काही वर्षांपूर्वी येथे अवतीभवती खूप इमारती उभ्या राहू लागल्या होत्या. लोकवस्ती भराभर वाढत चालली होती. लोकांच्या लक्षात आले की, हजारो माणसे इथे राहणार. पण त्यांच्या मुलांसाठी खेळायला साधं मैदान नाही! काहीजणांनी मग प्रयत्न केले. काहीजणांनी हातभार लावला आणि त्यातून माझा जन्म झाला.

मी किती मोठं कार्य करतो ठाऊक आहे ? मुलांच्या खेळण्याची सोय तर मी केलेलीच आहे. शिवाय, माझ्या काठाकाठाने मोठमोठे डेरेदार वृक्ष डौलात उभे आहेत. या परिसराचं मोठं वैभव आहे ते. संध्याकाळी लहान मुलं व बायकासुद्धा येथे विरंगुळ्यासाठी येतात. सकाळी व संध्याकाळी फेरी मारण्यासाठी ज्येष्ठ नागरिक तर आवर्जून येतात. इमारतींनी भरलेल्या या परिसरात ही माझी जागाच तेवढी मोकळी आहे. काहीजण त्यामुळेच हे मैदान म्हणजे या परिसराचं फुप्फुस आहे, असं म्हणतात. केवढा हा माझा सन्मान !

मात्र अलीकडे मला वेदना होऊ लागल्या आहेत. काही दुष्ट लोक माझे लचके तोडत आहेत. मला बळकावण्याचं कारस्थान चालू आहे. शिवाय सगळेजण येऊन येथे घाण करतात. सकाळी तर दुर्गंधी पसरते ! फेरीवाले, भिकारी यांनीही माझे लचके तोडण्याचे काम चालू ठेवलं आहे. काहीजण इथली झाडंही अकारण तोडत असतात. असं दुर्दशेत राहण्यापेक्षा माझा उपयोग फक्त मुलांना खेळण्यासाठीच असेल, असा कायदा केला तर किती बरं होईल?

Similar questions