Hindi, asked by vighneshmhatre30, 1 month ago

कोरोना काळातील शिक्षण पद्धती वर निबंध in Marathi​

Answers

Answered by salimshaikh199180
3

Answer:

अनेक ठिकाणी ऑनलाईनकडे वळतं होणं आमच्यासाठी सोपं ठरलं. लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर लगेच आम्ही ऑनलाईनकडे वळालो. जवळपास सगळे वर्ग गुगल मीट किंवा झूमवर घेतले जात होते," दिल्लीतल्या अशोका यूनिव्हर्सिटीतील प्राध्यापक सैकत मजूमदार सांगतात.

"पण, असं असलं तरी विद्यापाठीत काही विद्यार्थी असे आहेत, ज्यांना इंटरनेट कनेक्शनविषयी समस्या आहेत. यामध्ये काश्मीर आणि इतर दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचा सामावेश आहे."

देशातील अनेक खासगी शाळांनी आता झूम अॅपवर वर्ग घेण्यास सुरुवात केली आहे. पण, ही फक्त तात्पुरती सोय आहे, असं अनेक पालकांचं म्हणणं आहे.

नाव न छापण्याच्या अटीवर एका दोन मुलांच्या पालकानं बीबीसीला सांगितलं, "माझे दोन्ही मुलं नियमितपणे झूमवरच्या शिकवणी वर्गाला हजेरी लावतात. पण, ऑनलाईन शिक्षणाच्या अनुभवाची गुणवत्ता ही ठीक आहे. शिक्षकाला विद्यार्थ्याशी वन-टू-वन संवाद साधायला इथं मर्यादा येते."

याशिवाय कॅम्पस एक्सपरियन्सची संकल्पना कोरोनामुळे पूर्णपणे बदलल्याचं विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी बोलल्यानंतर माझ्या लक्षात आलं.

"आमचं पुढचं सत्र ऑनलाईन होण्याची दाट शक्यता आहे. आम्ही विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं अभ्यासक्रम देत आहोत. पण, असं असलं तरी काही प्रमाणात हे काम आव्हानात्मक असणार आहे," सैकत सांगतात.

एकदा लॉकडाऊन संपल्यानंतर पुन्हा कशा पद्धतीनं शाळा आणि विद्यापीठांनी सुरुवात करावी हा सुद्धा प्रश्न आहे. सोशल डिस्टन्सिंग हा महत्त्वाचा मुद्दा आणि ज्या पद्धतीनं यूरोप, दक्षिण कोरिया आणि चीनमध्ये शैक्षणिक संस्था सुरू करण्यात आल्या आहेत, त्यातून बोध घेता येऊ शकतो.

Similar questions