क्रियाविशेषण अव्ययाचे चार उपप्रकारांचे शब्द वापरुन 10 वाक्ये लिहा . चार उपप्रकारांचे शब्द वापरा. plz tell correct answer I will mark brainliest
Answers
Answer:
क्रियाविशेषण अव्यय व त्याचे प्रकार
क्रियापदाची विशेष माहिती सांगून क्रियापदाची व्याप्ती मर्यादित करणार्या शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात. ज्याप्रमाणे विशेषण हे नामाबद्दलची विशेष माहिती देते, त्याचप्रमाणे क्रियाविशेषण हे क्रियापदाबद्दल विशेष माहिती देते.
क्रियाविशेषण अव्ययांचे प्रमुख 2 प्रकार घडतात.
अर्थावरून
स्वरूपावरून
अर्थावरून पडणारे प्रकार :
1. कालवाचक क्रियाविशेषण अव्यय :
कालवाचक क्रियाविशेषण अव्ययांचे 3 प्रकार पडतात.
अ. कालदर्शक –
वाक्यातील क्रिया केव्हा घडली आहे हे दर्शविणार्याप शब्दांना ‘कालदर्शक’ क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.
उदा. आधी, आता, सद्य, तूर्त, हल्ली, काल, उधा, परवा, लगेच, केव्हा, जेव्हा, पूर्वी, मागे, रात्री, दिवसा इत्यादि.
मी काल शाळेत गेलो होतो
मी उदया गावाला जाईन.
तुम्हा केव्हा आलात?
अपघात रात्री झाला.
ब. सातत्यदर्शक –
वाक्यातील क्रियेचे सातत्य दर्शविणार्या शब्दांना ‘सातत्यदर्शक’ क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.
उदा. नित्य, सदा, सर्वदा, नेहमी, दिवसभर, आजकाल, अधाप,
पाऊस सतत कोसळत होता.
सुमितचे आजकाल अभ्यासात लक्ष नाही.
पोलिसांना अधाप चोर सापडला नाही.
क. आवृत्तीदर्शक –
वाक्यात घटनेची पुनरावृत्ती दर्शविणार्या शब्दांना ‘आवृत्तीदर्शक’ क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.
उदा. फिरून, वारंवार दररोज, पुन्हा पुन्हा, सालोसाल, क्षणोक्षणी, एकदा, दोनदा इये.
आई दररोज मंदिरात जाते.
सीता वारंवार आजारी पडते.
फिरून तुम्ही तोच मुद्दा उपस्थित करत आहात.
संजय क्षणोक्षणी चुकत होता.
2. स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय :
या वाक्यामधील ज्या क्रियाविशेषणाव्दारे क्रियेच्या स्थळ किंवा ठिकाणाचा बोध होत असेल अशा अव्ययास स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.
स्थळवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे 2 प्रकार पडतात.
अ. स्थितीदर्शक –
उदा. येथे, तेथे, जेथे, वर, खाली, कोठे, मध्ये, अलीकडे, मागे, पुढे, जिकडे-तिकडे, सभोवताल इत्यादि.
मी येथे उभा होतो.
जिकडे-तिकडे भ्रष्टाचार सुरू आहे.
तो खाली बसला.
मी अलीकडेच थांबलो.
ब. गतिदर्शक –
उदा. इकडून, तिकडून, मागून, पुढून, वरून, खालुन, लांबून, दुरून.
जंगलातून जातांना पुढून वाघ आला
चेंडू दूर गेला.
घरी जातांना इकडून ये.
3. रितीवाचक क्रियाविशेषण अव्यय –
वाक्यातील क्रिया कशी घडते किंवा तिची रीत दाखविण्यासाठी जे शब्द वापरतात त्यांना ‘रितीवाचक क्रियाविशेषण अव्यय’ असे म्हणतात.
याचे 3 प्रकार पडतात.
अ. प्रकारदर्शक –
उदा. असे, तसे जसे, कसे, उगीच, व्यर्थ, फुकट, आपोआप, मुद्दाम, जेवी, तेवी, हळू, सावकाश, जलद इत्यादी.
राहुल सावकाश चालतो.
तो जलद धावला.
सौरभ हळू बोलतो
ब. अनुकरणदर्शक –
उदा. झटकण, पटकण, पटापट, टपटप, चमचम, बदाबद, इत्यादी.
त्याने झटकण काम आटोपले.
दिपा पटापट फुले वेचते.
त्याने जेवण पटकण आटोपले.
क. निश्चयदर्शक –
उदा. खचित, खरोखर, नक्की, खुशाल, निखालस इत्यादी.
राम नक्की प्रथम क्रमांक पटकावणार
तू खुशाल घरी जा.
तुम्ही खरोखर जाणार आहात?
4. संख्यावाचक/परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय –
वाक्यामधील ज्या क्रियाविशेषणामुळे क्रिया किती वेळा घडली किंवा क्रियेच्या परिमाणाचा बोध होत असेल त्या अव्ययास, परिमाण वाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.
उदा. कमी, जास्त, किंचित, जरा, काहीसा, थोडा, क्वचित, अत्यंत, अगदी, बिलकुल, मुळीच, भरपूर, अतिशय, मोजके, पूर्ण इत्यादी.
मी क्वचित सिनेमाला जातो.
तुम्ही जरा शांत बसा.
राम अतिशय प्रामाणिक आहे.
तो मुळीच हुशार नाही.
5. प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय –
वाक्यामधील ज्या क्रियाविशेषणातून प्रश्नाचा बोध होतो त्या क्रियाविशेषणाला प्रश्नार्थक क्रियाविशेषण असे म्हणतात.
उदा. तू गावाला जातो का?
तू आंबा खाणार का?
तुम्ही सिनेमाला याल ना?
तुम्ही अभ्यास कराल ना?
6. निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय –
वाक्यामधील ज्या क्रियाविशेषणावरुन नकार किंवा निषेधात्मक बोध होत असेल त्या क्रिया विशेषणाला निषेधार्थक क्रियाविशेषण असे म्हणतात
उदा.मी न विसरता जाईन.
तो न चुकता आला.
त्याने खरे सांगितले तर ना !
मी न चुकता तुला भेटेल.
स्वरूपावरून पडणारे प्रकार :
1. सिद्ध क्रियाविशेषण अव्यय –
काही शब्द मुळातच क्रियाविशेषण असतात त्यांना ‘सिद्ध क्रियाविशेषण अव्यय’ असे म्हणतात.
उदा. मागे, पुढे, येथे, तेथे, आज इत्यादी.
तो मागे गेला.
तू पुढे पळ.
ती तेथे जाणार.
आम्ही येथे थांबतो.
2. साधीत क्रियाविशेषण अव्यय –
नाम, विशेषण, क्रियापद, शब्दयोगी अव्यय यांच्यापासून झालेल्या क्रियाविशेषणांना ‘साधित क्रियाविशेषण’ असे म्हणतात.
यांची 2 गटात विभागणी होते.
साधीत क्रियाविशेषण अव्यय –
नामसाधीत: रात्री, दिवसा, सकाळी, व्यक्तिश, वस्तूत:
सर्वनामसाधीत: त्यामुळे, यावरून, कित्येकदा,
विशेषणसाधीत: मोठयाने, एकदा, इतक्यात, एकत्र.
धातुसाधीत: हसू, हसत, हसतांना, पळतांना, खेळतांना
अव्ययसाधीत: कोठून, इकडून, खालून, वरून.
प्रत्यय सधीत: शास्त्रदृष्ट्या, मन:पूर्वक, कालानुसार.
उदा. तो रात्री आला.
मी त्यांना व्यक्तिश: भेटलो.
तिने सर्व रडून सांगितले.
त्याने हे काम मन:पूर्वक केले.
तु हसतांना छान दिसतेस.
धबधबा वरून कोसळत होता.
आम्ही एकत्र अभ्यास करतो.
तो कित्येकदा खोटे बोलतो.
सामासिक क्रियाविशेषण अव्यय
काही जोडशब्द किंवा सामाजिक शब्द क्रियाविशेषण अव्ययाचे काम करतात अशा दोन शब्दांना सामासिक क्रियाविशेषण अव्यय म्हणून ओळखले जाते.
उदा. गावोगाव, गैरहजर, गैरकायदा, दररोज, प्रतिदिन, रात्रंदिवस, समोरासमोर, घरोघर, यथाशक्ती, आजन्म, हरघडी इत्यादी.
आज निलेश वर्गात गैर हजर आहे.
चोराच्या शोधात पोलिस गोवोगाव फिरले.
पाऊस दररोज पडतो.
मी यथाशक्ती त्याची मदत करेन.
विधार्थी रात्रंदिवस अभ्यास करतात.