(२) कारणे शोधा
(अ) आवाजाची वाट पाहण्याचं सार्थक व्हायचं, कारण .............
(अा) म्हातारीच्या तोंडावर समाधान पसरायचं, कारण .............
(इ) पुस्तक वाचण्याची वाट पाहण्यात उन्हाळ्याच्या आधीचा काळ लेखिकेला वेड लावायचा,
कारण .............
(ई) पोस्टमन मनानंच कोरं पत्र वाचतो, कारण .............
Answers
"नमस्कार,
सदर प्रश्न कुमारभारती (१० वी) या पुस्तकातील 'वाट पाहताना - अरुणा ढेरे' या पाठातील आहे.
★ कारणे शोधा
(अ) आवाजाची वाट पाहण्याचं सार्थक व्हायचं, कारण -
उत्तर- रात्री झोपताना पहाटे कुहूकुहू ऐकू यावे ही इच्छा बाळगलेली असायची. सकाळच्या आवाजाने वाट पाहण्याचं सार्थक होऊन जाई.
(अा) म्हातारीच्या तोंडावर समाधान पसरायचं, कारण -
उत्तर- पोस्टमन जेव्हा मनानेच कोर पत्र वाचायचा तेव्हा आपला दूर राहणारा मुलगा आपली एवढी आठवण काढतो या विचाराने म्हातारीच्या चेहऱ्यावर आनंद पसरायचा.
(इ) पुस्तक वाचण्याची वाट पाहण्यात उन्हाळ्याच्या आधीचा काळ लेखिकेला वेड लावायचा,
कारण -
उत्तर- उन्हाळ्यात वाचलेल्या पुस्तकांतून भाषेशी शक्ती, लेखकांची प्रतिभा यावर लेखिकेच प्रेम जडलं होत. म्हणून तो वाट पाहण्याचा काळ लेखिकेला वेड लावायचा.
(ई) पोस्टमन मनानंच कोरं पत्र वाचतो, कारण -
उत्तर- त्या म्हातारीला पुत्रप्रेमाचा आनंद मिळावा आणि तिचे शेवटचे दिवस आनंदात जावेत म्हणून पोस्टमन मनानेच कोर पत्र वाचायचा.
धन्यवाद..."
(२) कारणे शोधा
खालील सर्व कारणे शोधा प्रश्न "वाट पाहताना " या अरुणा ढेरे या लेखिकेच्या इयात्त १०वी "कुमारभारती" या पुस्तकात प्रकाशित झालेल्या पाठातील आहे.
(अ) आवाजाची वाट पाहण्याचं सार्थक व्हायचं, कारण रात्री झोपताना मनात एक इच्छा असायची कि पहाटे-पहाटे कोकिळेचे कुहूकुहू ऐकू यावे , व खरंच पहाटे उठल्यावर हि इच्छा पूर्ण होत असे.
(अा) म्हातारीच्या तोंडावर समाधान पसरायचं, कारण परदेशात राहणारा तिचा मुलगा तिची आठवन काढत असेल व तो एक दिवस तिला त्याच्या घरी नक्की नेईल. या कल्पनेने म्हातारीचे मन सुखावत असे.
(इ) पुस्तक वाचण्याची वाट पाहण्यात उन्हाळ्याच्या आधीचा काळ लेखिकेला वेड लावायचा, कारण लेखिकेला निरनिराळे पुस्तके वाचायला,रसग्रहण करायला आवडत असे ,त्यातून त्यांना भाषेची शक्ती मिळत असे , अशी लेखिकेची प्रतिभा होती
(ई) पोस्टमन मनानंच कोरं पत्र वाचतो, कारण पाठात वर्णविलेल्या म्हातारीला पुत्रभेटीचा आनंद मिळावा आणि तिने तिचे उरलेले आयुष्य तिच्या मुलासोबत घालवावे ,अशी पोस्टमनची ईच्छा होती .