) कृष्णदेवरायांच्या काळात वाहतूक कशातून चालायची?
Answers
Answer:
विजयानगरच्या तुळुव व इतर तीन घराण्यांतील सर्वांत थोर व प्रतापी राजा. १५०९ साली वीर नरसिंहानंतर तो गादीवर आला. त्या वेळी राज्याच्या चारी बाजूंनी उम्मत्तूरचा नंदराज व इतर नायक, ओरिसाचा गजपती प्रतापरुद्र, बहमनी महंमूदशाह, आदिलशाह वगैरे लहान-मोठे राजे कृष्णदेव रायाविरुद्ध उठले होते. कृष्णदेवरायाने या सर्वांशी अत्यंत बहादुरीने आणि कुशलतेने मुकाबला केला. प्रथम त्याने १५१० मध्ये जिहाद पुकारलेल्या बहमनीच्या महंमूदशाहाचा व त्याला मदत देणाऱ्या विजापूरच्या आदिलशाहाचा पराभव केला. कृष्णा-तुंगभद्रा अंतर्वेदीतील प्रदेश, रायचूर (१५१२), गुलबर्गा, बीदर हे भाग जिंकून घेतले. त्याने महंमूदशाहास पुन्हा गादीवर बसविले व यवन-राज्य-स्थापनाचार्य ही पदवी धारण केली. याच वेळी त्याने इक्केरी, मदुरा येथील नायकांचा बंदोबस्त करून त्यांच्याकडून खंडणी घेतली. १५११ - १२ मध्ये त्याने उम्मत्तूर, शिवसमुद्रम्, श्रीरंगपट्टणम् आणि इतर प्रदेश आपल्या राज्यास जोडले. १५१३ ते १८ दरम्यान शत्रूकडे गेलेला प्रदेश प्रतापरुद्रकडून तर मिळविलाच;पण त्याच्या राज्यातील बराच प्रदेश जिंकून त्यास हैराण केले. शेवटी त्याने आपली मुलगी कृष्णदेवरायास देऊन त्याच्याशी तह केला. यानंतर त्याने उदयगिरी, कोंडविडू, कोंडापल्ली आणि सिंहाचलम् जिंकून जवळजवळ सध्याचा सबंध आंध्र प्रदेश आपल्या राज्यास जोडला. सोळाव्या शतकातील ही दक्षिणेतील स्वारी लष्करी दृष्ट्या एक तेजस्वी घटना समजली जाते.
इस्माईल आदिलशाहाने जिंकलेले रायचूर कृष्ण देवरायाने १५२० मध्ये परत मिळविले. ठरलेल्या वेळी इस्माईल आदिलशाह मुद्गल येथे शरण न आल्यामुळे त्याने गुलबर्गा, सागर, सोलापूर आणि विजापूर येथील
लढायांत आदिलशाहाचा पराभव केला. कृष्णदेवरायाने आपल्या कारकीर्दीच्या उत्तरार्धात आपला प्रधानतिम यास पोर्तुगीजांवर पाठविले होते. तथापि त्याचे व पोर्तुगीजांचे संबंध सामान्यतः मित्रत्वाचे असल्याने नूनीश, पायीश इ. पोर्तुगीज प्रवाशांनी विजयानगरला भेटी दिल्या. विजापूरकरांशी लढताना त्याने पोर्तुगीज सैनिकांचा उपयोग करून घेतला. ह्याने सारा दक्षिण भारत आपल्या सत्तेखाली आणला होता.