कृती ४ : (स्वमत/अभिव्यक्ती)
* मोठेपणी तुम्हाला कोण व्हावेसे वाटते आणि का, ते थोडक्यात लिहा.
Answers
Answer:
लहानपणापासूनच प्रत्येकाच्या मनात एक इच्छा असते की मोठे होऊन मी काहीतरी व्हावे. आपण समाजात ज्या वेगवेगळ्या गोष्टी बघतो किंवा ज्या गोष्टींचा आपल्या मनावर परिणाम होतो त्या वस्तूंकडे बघून आपल्यालाही त्याचे अनुकरण करावेसे वाटते किंवा तसे बनावेसे वाटते. माझे वडील अभियंता असल्याकारणाने लहानपणापासूनच मी त्यांना बघत होतो. स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामाचे नेहमीच कौतुक केले जाते. त्यांनी समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे.
एक अभियंता काय करू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे माझे वडील. मलाही मोठे होऊन माझ्या वडिलांसारखे बनायला खूप आवडेल. मलाही एक मोठा अभियंता व्हायचे आहे. समाजासाठी काहीतरी उत्तम गोष्टीची निर्मिती करून सामान्य माणसाच्या जीवनात कसा बदल घडवता येईल यासाठी काहीतरी करायचे आहे. कारण असे म्हटले जाते की जर देशातील अभियंता हे सक्षम असतील तर देशाचे रूप पालटायला वेळ लागत नाही.
माझ्या वडिलांनी माझ्या समोर ठेवलेला आदर्श घेऊन मला ही एक उत्तम अभियंता बनायचे आहे.
Answer:
तुम्हाला कोण व्हावेसे वाटते आणि का ते थोडक्यात लिहा