(६) कंदील व विजेरी (बॅटरी) यांच्यातील संवादाची कल्पना करून संवादलेखन करा
कंदील : ..................................................................................
विजेरी : ..................................................................................

Answers
नमस्कार,
सदर प्रश्न कुमारभारती (१० वी) च्या पुस्तकातील ""वस्तू"" या कवितेतील आहे. कवी द. भा. धामणस्कर यांनी निर्जीव वस्तूंनाही भावना असते. त्या वस्तूंशी असलेला स्नेहभाव आपण जोपासावा त्यांचे आयुष्य माणसासारखेच संवेदनशील असते; त्यांच्याविषयी कृतज्ञताभाव जपावा, अशी शिकवण या कवितेतून दिली आहे.
★ कंदील व विजेरी (बॅटरी) यांच्यातील संवाद.
कंदील : कशी आहेस? खूप दिवसांनी भेट झाली आपली.
विजेरी : मी ठीक आहे पण तू इथे काय करतोस? तुझी आता गरज उरली नाही.
कंदील : तुझे आणि माझे काम तर एकच आहे. दुसऱ्यांना प्रकाश देणे.
विजेरी : हो ते खरे आहे, पण तू आता खूप जुना पूराना झालास. तुला पेटवताना किती कष्ट पडतात. मी पहा, एक बटण दाबले की दूरवर प्रकाश पाडते.
कंदील : हो पण तुझा प्रकाश तीव्र असतो त्याने डोळ्यांना त्रास होतो. मी अगदी मंद तेवत राहतो.
विजेरी : तु तर उगाच मिनमिणतोस, माझ्या प्रकाशाचा किती झगमगाट असतो.
कंदील : अग तुला सेल लागतात पेटवायला. ते गेले की तुझा खेळ समाप्त.
विजेरी : तुलाही तेल लागताच ना, तेल घाला, वाट ठेवा. तेव्हा तू पेटतोस.
कंदील : माझ्याकडे तेल आहे. तेलाला स्नेह म्हणतात.
विजेरी : हो पण काळ आता बदललाय. आता तुझी गरज नाही.
कंदील : ते काहीही असो प्रकाश देणे हे आपल्या दोघांचे व्रत आहे. आपण आपल्या कामाचा विसर पडू देता कामा नये.
विजेरी : हो खरचं!
धन्यवाद...
above Is the answer
Answer:
hope it helps