कोवीडचा भारतावर
प्रभाव (निबंध) plz guys answer
Answers
Answer:
कोरोना व्हायरसचा उद्रेक झाल्यानंतर गेल्या काही दिवसांमध्ये शेअर बाजार कोसळल्याच्या बातम्या तुम्ही ऐकल्या असतील. कोरोनामुळे अर्थव्यवस्थेला खीळ, कोरोनामुळे शेअर बाजारात घसरण, गुंतवणूकदारांमध्ये अविश्वासाचे वातावरण अशा हेडलाइन्स तुमच्या वाचण्यात किंवा ऐकण्यात आल्या असतील.
पण अर्थव्यवस्था ही फक्त शेअर बाजार, गुंतवणूकदार या पुरतीच मर्यादित आहे का? अर्थव्यवस्था ही फक्त याच गोष्टींबद्दल नसते, तर आपल्याकडे जो किराणा येतो, भाज्या येतात, दूध येणं, वाहतूक हे सर्व घटक अर्थव्यवस्थेत येतात. त्यामुळे कोरोनाचा एकूण अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झाला आणि भविष्यात होऊ शकतो, हे आपण समजून घेऊया.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सोमवारी त्यांच्या एका फेसबुक लाईव्हमध्ये म्हणाले की "कोरोना व्हायरस हे मोठं संकट आहे. यामुळे अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे आणि पुढील 2-3 महिने आपली अर्थव्यवस्था नाजूक राहील. आपण काटकसर करावी."
शरद पवार यांनी अर्थव्यवस्थेवर चिंता व्यक्त केली आहे. पण याच बरोबर तुम्ही दोनच दिवसांपूर्वी दिल्लीतील आनंद विहार बस टर्मिनसवर जमलेल्या प्रवाशांची गर्दी तुम्ही पाहिली असेल. शुक्रवारी संध्याकाळी आनंद विहार टर्मिनलवर 30,000 लोक होते, असा अंदाज आहे.हे सर्व जण आपापल्या गावी परत जात होते.
पण हे लोक कोण आहेत?
यातले बरेच जण हे मजूर, कारखान्यांमधले कामगार आहेत. लॉकडाऊननंतर बांधकाम बंद झालं, उद्योगधंदे, दुकानं बंद झाली. त्याचा परिणाम या लोकांच्या रोजगारावर झाला. रोजगार नसल्यामुळे राहण्याच्या जागेचं भाडं, किराणा, भाज्या अशा गोष्टी विकत घेण्याची त्यांची क्षमता नष्ट झाली आणि हे पुन्हा कधी सुरू होईल याची त्यांना शाश्वती नसल्यामुळे अनेकांनी आपल्या घराची वाट धरली.
HOPE YOU LIKE IT!!!! ;)