काव्यसौंदर्य
1.
स्त्री-पुरुष समानते बाबत तुम्हाला अपेक्षित असलेले चित्र
तुमच्या शब्दात रेखाटा
Answers
स्त्री-पुरुष हे दोघेही एकच आहेत,त्यात भेद करण्यासारखं काहीच नाही.तरी त्यांच्यात भेद केले जातात,फक्त स्वार्थासाठी उच्च-कनिष्ठ असा भेद केला जातो.स्त्रीला मनुष्य न मानता तिला वस्तू समजून तिचा छळ केला जातो.बालविवाह,हुंडापद्धती, केशवपन, सतीप्रथा अशा जातक प्रथांना सामोरे जावे लागते.सरकारने किती ही निर्णय घेतले तरी हे काही थांबलेलं नाही.तस पाहिलं तर अन्याय हा फक्त स्त्रीवर नाही तर पुरुषावर देखील होत,त्यांना लहानापासून स्त्री ही वस्तू आहे हे शिकवलं जातं. तिला कसं वागवायच ,राबवायचं,तिने कसं राहील पाहिजे व जर ती तशी राहत नसेल तर तिच्यावर जबरदस्ती कशी करायची हे शिकवलं जातं.
जर स्त्री पुरुषापेक्षा प्रगती करत असेल,तर तिला कसं छळायच हे सांगितलं जातं या साखळीदनडातून तिला बाहेर काढायचं असेल तर पुरुषाला शिक्षण दिल पाहिजे.त्याला स्त्री शी कसे वर्तन केले पाहिजे तेव्हाच ही स्त्री आकाशापर्यंत आपली झेप घेऊ शकेल. तेव्हाच स्त्री पुरुष हा भेद कमी होईल.
Answer:
भारतात पूर्वापार पुरुषप्रधान संस्कृतीचे प्रस्थ असलेले आढळून येते. त्यामुळे, स्त्रियांना कायम दुय्यम स्थान दिले जाते; परंतु समाजसुधारकांच्या अथक प्रयत्नांमुळे स्त्रियांना समाजाच्या मुख्य प्रवाहात येणे शक्य झाले आहे. आज जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया आपले भरीव योगदान देताना दिसतात. तरीही आजही स्त्रियांना सर्वत्र समानतेची वागणूक मिळतेच असे नाही. स्त्री-पुरुष समानता प्रत्यक्षात अमलात येण्याकरता काही गोष्टींत बदल होण्याची गरज आहे असे मला वाटते. स्त्रीला मिळणाऱ्या दुय्यम स्थानाचे मूळ हे पुरुषप्रधान मानसिकतेत आहे. त्यामुळे, सर्वप्रथम पुरुषप्रधान मानसिकता बदलायला हवी. प्रत्येक स्त्रीने आपल्या मुलास वाढवतानाच समानतेची मूल्ये रुजवायला हवीत. जेव्हा कोवळ्या वयातच समानतेचे बीज मुलांच्या मनात पेरले जाईल तेव्हाच समानतेस स्वीकारणारा भविष्यातील समाज तयार होईल असे मला वाटते. जेव्हा घराघरांत स्त्री-पुरुष असा भेद न उरता, घरातली प्रत्येक जबाबदारी, कर्तव्ये ही दोघांची आहेत याची जाणीव होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने स्त्री-पुरुष समानता अस्तित्वात येईल.
Explanation: