काव्यसौंदर्य .(अ) ‘पावित्र्याची पांघर वस्त्रे , होऊन पटकुर पसरु नको’, या ओळीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.(आ) ‘शोभेहुनही श्रेष्ठ स्वच्छता, आदिमंत्र हा विसरू नको’, या ओळीत दडलेल्या अभियानाची गरज तुमच्याशब्दांत स्पष्ट करा.
Answers
नमस्कार मित्रांनो,
सदर प्रश्न कुमारभारती (९ वी) या पाठ्यपुस्तकातील "आपुले जगणे...आपुली ओळख!" या कवितेतील आहे. या कवितेचे कवी संदीप खरे हे आहेत. दैनंदिन जीवनात वागताना काय करावे व काय करू नये, याविषयी भाष्य कवीने सोप्या शब्दात कवितेतून व्यक्त केले आहे. सदर कविता 'अग्गोबाई ढग्गोबाई' या काव्यसंग्रहातून घेतली आहे.
◆ काव्यसौंदर्य .
(अ) ‘पावित्र्याची पांघर वस्त्रे , होऊन पटकुर पसरु नको’,
उत्तर- आपले चारित्र्य शुद्ध असावे. त्यात पावित्र्य असावे. आपले वागणे उदात्त असावे. पटकुर म्हणजे घाणेरडे वस्त्र. कोणतेही घाणेरडे गलिच्छ काम करू नको असे कवी सांगत आहे.
(आ) ‘शोभेहुनही श्रेष्ठ स्वच्छता, आदिमंत्र हा विसरू नको’,
उत्तर- फक्त शोभा दाखवण्यापेक्षा स्वच्छता हीच श्रेष्ठ आहे. शोभेपेक्षा स्वच्छता पाळ हा आदिमंत्र या कवितेतून सुचवला आहे.
धन्यवाद...
Explanation:
1) 'पावित्र्याची पांघर वस्त्रे, होऊन पटकुर पसरू नको' या ओळीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.
उत्तर :
माणसाने आपले आयुष्य कसे जगावे हे सांगताना कवी म्हणतात-श्रीमंतीचा बडेजाव दाखवणारी किमती वस्त्रे घालणे, योग्य नव्हे. म्हणजे श्रीमंतीचे प्रदर्शन करू नये. मनाची शुद्धता महत्त्वाची आहे. मन पवित्र हवे. मंगलतेची वस्त्रे घालावीत. स्वतःचे जीवन चिंध्या झालेल्या पटकुराप्रमाणे दीनवाणे, लाचार असू नये. स्वतःच्या मनाचे मलीन, घाणेरडे वस्त्र करू नये. मनाच्या पावित्र्याचा विचार या ओळींत मांडला आहे.
2) 'शोभेहुनही श्रेष्ठ स्वच्छता, आदिमंत्र हा विसरू नको, ' या ओळीत दडलेल्या अभियानाची गरज तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तर :
दिखाऊ प्रदर्शनापेक्षा स्वच्छता महत्त्वाची आहे. शोभेचा बडेजाव करणे व्यर्थ आहे. मनाची शुद्धता व परिसराची स्वच्छता असावी, हा बीजमंत्र कधी विसरू नये, अशी कवींनी या ओळीतून शिकवण दिली आहे. या ओळीत स्वच्छता अभियान दडलेले आहे. स्वच्छता राखली की रोगराई होत नाही. आरोग्य धोक्यात येत नाही. शुद्ध मोकळी हवा व निर्मळ पाणी मिळते. 'गाडगेबाबा गावेच्या गावे झाडून स्वच्छ करीत. सेनापती बापटांनी स्वच्छतेचा वसा आपणांस दिला आहे. 'स्वच्छता हा परमेश्वर आहे,' असे सुवचन आहे. 'शोभेपेक्षा स्वच्छता श्रेष्ठ आहे,' या मूलमंत्रात स्वच्छतेची महती कवींनी सांगितली आहे व स्वच्छता अभियानाचा पुरस्कार केला आहे.