India Languages, asked by saaammi5745, 1 year ago

(५) काव्यसौंदर्य.
(अ) ‘तुझे शब्द जसे कीमहाकाव्ये तुझ्या पायाजवळ गळून पडावीततुझा संघर्ष असा कीकाठ्यांच्या संगिनी व्हाव्यात.’, या ओळींचे रसग्रहण करा.(आ) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कवितेतून जाणवलेले कर्तृत्व तुमच्या शब्दांत लिहा.(ई) अगाध ज्ञानाच्या बळावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य, तुमच्या शब्दांत थोडक्यात लिहा.

Answers

Answered by Mandar17
47

"नमस्कार,

सदर प्रश्न मराठी कुमारभारती (१० वी) पुस्तकातील ज. वि. पवार यांच्या 'तू झालास मूक समाजाचा नायक' या काव्यातील आहे.


★ काव्यसौंदर्य - पंक्तीचे रसग्रहण -

उत्तर- प्रस्तुत कवितेत ज. वि. पवार यांनी आंबेडकरांना मूक समाजाचा महानायक म्हणून अभिवादन केले आहे. दिलेल्या पंक्तीत कवी म्हणतात की आंबेडकरांचे सरळ आणि कठोर बोलणे हे एखाद्या महाकाव्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. आंबेडकरांनी शोषितांसाठी केलेला संघर्ष एवढा महान होता की त्यामुळे लोकांच्या हातातील काठ्याच्या बंदुकांपेक्ष्या धोकादायक असत.


★ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कवितेतून जाणवलेले कर्तृत्व -

उत्तर- डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक श्रेष्ट विचारवंत होते. वर्णव्यवस्थेच्या जखडात अडकलेल्या पिडीत समाजामुळे जागृती आणण्याचे कार्य करणारे ते जणु एक महानायकच. त्यांनी समाजाला नवविचारांचा प्रेरणादायक मार्ग दाखवला. मार्गात येणाऱ्या सर्व समस्यांना सामोरे जाऊन त्यांनी एक इतिहास घडवला. दलित समाजाला त्यांनी योग्य तो सन्मान मिळवून दिला.


★ अगाध ज्ञानाच्या बळावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य -

उत्तर- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ज्ञान अगाध होते. अथक परिश्रम घेऊन त्यांनी पदवी मिळवली. या ज्ञानाच्या बळावर आंबेडकरांनी दलित जनतेसाठी अनेक कामे केली. मूक समाजाचे नेतृत्व केले, चवदार तळ्याचा संग्राम केला, बहिष्कृत भारत जागा केला, परिस्थितीवर मात करुन नवीन इतिहास घडवला.


धन्यवाद..."

Answered by ksk6100
23

(५) काव्यसौंदर्य.

(अ) ‘तुझे शब्द जसे कीमहाकाव्ये तुझ्या पायाजवळ गळून पडावीततुझा संघर्ष असा कीकाठ्यांच्या संगिनी व्हाव्यात.’, या ओळींचे रसग्रहण करा

उत्तर:- वरील काव्यसौंदर्य 'तू झालास मूक समाजाचा नायक' या ज. वि. पवार यांच्या कवितेतील आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शब्दाची किमया आणि संघर्षाचा परिणाम यांची माहिती वरील ओळींमध्ये कथन केलेली आहे. चवदार तळ्यावर सर्वांसाठी पाणी खुले करतांना महामानवाने जी घोषणा केली त्या शब्दांपुढे सर्व महाकाव्ये नतमस्तक व्हावीत अशी होती तसेच जो संघर्ष केला त्याचा प्रभाव असा पडला कि शोषितांच्या हातातल्या काठ्या जणू जहाल बंदुका झाल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शब्द व संघर्षांचे सामर्थ्य यातून व्यक्त होते.  

(आ) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कवितेतून जाणवलेले कर्तृत्व तुमच्या शब्दांत लिहा.

उत्तर :- कठीण परिस्थितीवर मत करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नवा इतिहास घडविला अन्यायाविरुद्ध व ना बोलणाऱ्या समाजात जनजागृती केली. अगाध ज्ञानाच्या बळावर लढा पुकारून शोषित जनतेच्या पायातल्या बेड्या मुक्त केल्या. चवदार तळ्याचा  संग्राम यशस्वी केला.बहिष्कृत भारताला आत्मविश्वास दिला.  

(ई) अगाध ज्ञानाच्या बळावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य, तुमच्या शब्दांत थोडक्यात लिहा.

उत्तर:- अतिशय कठीण व हलाकीच्या परिस्थितीतून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपले शिक्षण पूर्ण केले. ते उच्चविद्याविभूषित होते. त्यांनी बॅरिस्टर हि पदवी संपादन केली. त्यांनी आपल्या अगाध ज्ञानाच्या बळावर बहिष्कृत समाजाला अन्यायापासून मुक्त करण्याचे अतिशय महत्वाचे कार्य केले. त्यांनी शोषित, पीडित, व वर्णव्यवस्थेतून नाकारलेल्या , समृद्धीपासून वंचित असलेल्या जनतेला संघटित केले त्यांना शिका,संघटित व्हा व संघर्ष करा हा मूलमंत्र दिला.

Similar questions