(३) ‘प्रेम आणि आपुलकी’ या गोष्टींमुळे भरकटलेली मुले पुन्हा स्वगृही जाण्यास तयार होतात, हे पाठाच्या आधारे स्पष्ट करा.
Answers
"नमस्कार,
सदर प्रश्न मराठी कुमारभारती (१० वी) पुस्तकातील 'सबइन्स्पेक्टर रेखा मिश्रा' या स्थूलवाचनातील आहे.
★ ‘प्रेम आणि आपुलकी’ या गोष्टींमुळे भरकटलेली मुले पुन्हा स्वगृही जाण्यास तयार होतात -
उत्तर- रेखा मिश्रा यांनी पोलीस सेवेतील फक्त १.५ वर्षाच्या काळात ४३४ भरकटलेल्या मुलामुलींना त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले. आपल्या या अनुभवात रेखा मिश्रा सांगतात की बरीचशी मुले घरात भांडण, झगमगीत शहर, पत्ता चुकने, कामाचा शोध या कारणांमुळे घर सोडून गेलेले असतात. ती मुले स्वभावाने वाईट नसतात. फक्त वाईट संगतीमुळे किंवा परिस्थितीमुळे ती भरकटलेली असतात. अशा मुलांना प्रेम व आपुलकी दाखवली की ती आपल्या जवळ येतात, त्यांच्या समस्या सांगतात. अशेच प्रेमाने वागले की मन वळवून आपण त्यांना घरी येण्यासाठी पटवू शकतो.
धन्यवाद..."
(३) ‘प्रेम आणि आपुलकी’ या गोष्टींमुळे भरकटलेली मुले पुन्हा स्वगृही जाण्यास तयार होतात, हे पाठाच्या आधारे स्पष्ट करा.
उत्तर :- श्रीमती रेखाजी या पोलीस दलात कर्तव्यतत्पर असून त्यांनी गुनहेगारी करणाऱ्या मुलांना चांगल्या वळणावर आणले, त्यांनी आईच्या मायेने अश्या मुलांना जवळ घेतले आपलेसे केले. त्यामुळे हि मुले पुन्हा घरी जाण्यास राजी झाली . चांगले आयुष्य सुरु करण्यासाठी त्यांना परत एकदा संधी मिळाली ती रेखाजींमुळे . पोलीस खात्याचा बडगा दाखविण्यापेक्षा त्या लहान गुन्हेगार मुलांसोबत प्रेमाने बोलत व त्यांच्याशी मैत्री करीत त्यामुळे हि मुले रेखाजींच्या जवळ अली . प्रेमाने वागू लागली व आपल्या स्वगृही जाण्यासाठी तयार झालीत.