काव्यसौंदर्य .(अ) ‘तुझ्या शस्त्रांना, अस्त्रांना शक्ति देईल भवानी, शिवरायाचे स्वरूप आठवावे रणांगणी’, याकाव्यपंक्तीतून व्यक्त होणारा अर्थ स्पष्ट करा.(आ) ‘धन्य करी माझी कूस, येई विजयी होऊन, पुन्हा माझिया हाताने दूधभात भरवीन’, या काव्यपंक्तीतीलभावसौंदर्य स्पष्ट करा.
Answers
नमस्कार मित्रांनो,
सदर प्रश्न कुमारभारती (९ वी) या पाठ्यपुस्तकातील "निरोप" या कवितेतील आहे. या कवितेच्या कवयित्री पद्मा गोळे आहेत. पद्मा गोळे या प्रसिद्ध कवयित्रि आहेत. "प्रीतिपथावर," "आकाशवेडी," "श्रावनमेघ," "स्वप्नजा," "निहार" इत्यादी त्यांचे कवितासंग्रह आहेत. त्याचबरोबर त्यांनी "रायगडावरील एक रात्र", "नवी जाणीव" "स्वप्न"इत्यादी नाटिका लिहिल्या आहेत.
रणांगणावर (लढाईवर) जाणाऱ्या आपल्या मुलांविषयी आईच्या मनात येणाऱ्या वेगवेगळ्या भावनांचे कवीने सुंदर वर्णन केले आहे
★ काव्यसौंदर्य.
(अ) ‘तुझ्या शस्त्रांना, अस्त्रांना शक्ति देईल भवानी, शिवरायाचे स्वरूप आठवावे रणांगणी’, याकाव्यपंक्तीतून व्यक्त होणारा अर्थ स्पष्ट करा.
उत्तर- तुला रणांगणावर लागणाऱ्या शस्त्रांना अस्त्रांना देवी भवानी शक्ती देईल. रणांगणावर लढताना शिवरायांचा पराक्रम आठवावा.
(आ) ‘धन्य करी माझी कूस, येई विजयी होऊन, पुन्हा माझिया हाताने दूधभात भरवीन’, या काव्यपंक्तीतीलभावसौंदर्य स्पष्ट करा.
उत्तर -तू विजयी होऊनच लवकर घरी ये.
तुझ्या पराक्रमाचा मला स्वाभिमान वाटला पाहिजे.
जेव्हा तू विजयी होऊन परत येशील तेव्हा मी परत माझ्या हातांनी तुला दूधभात भरवेन.
धन्यवाद...